शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वैज्ञानिक आणि संशोधकांनी शेतकऱ्यांशी नियमित संवाद ठेवावा आणि मिशन मोड वर काम करावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. गुंतवणूक खर्च कमी, मूल्यवर्धन आणि कृषीमालाचे योग्य विपणन या द्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते असेही ते म्हणाले. कर्नाटकमधल्या बिदर येथे कर्नाटक पशूवैद्यक, पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते.
नील क्रांतीवर भर देण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देऊन कृषी आणि दुग्धविकास क्षेत्राबरोबरच मत्स्य व्यवसायालाही प्राधान्य द्यायला हवे असे ते म्हणाले.
पशूपालन, दुग्ध आणि कुक्कुटपालन यासारखे पूरक व्यवसाय, शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर घालण्यात महत्वाची भूमिका बजावतात. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबरोबरच अन्न आणि पोषण सुरक्षा पुरवण्याचे जागतिक आव्हान पेलणेही महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
Published on: 31 August 2018, 09:18 IST