कृषी विज्ञान केंद्र, बोरगांव सातारा येथे शास्त्रीय सल्लागार समिती बैठक संपन्न

Monday, 06 August 2018 11:39 AM

कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव येथे शुक्रवार, दिनांक 20.07.2018 रोजी शास्त्रीय सल्लागार समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचे मा. कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा होते. तसेच या बैठकीसाठी विद्यापीठातील डॉ. किरण कोकाटे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. अशोक फरांदे, अधिष्ठाता (कृषि), डॉ. शरद गडाख, संचालक संशोधन, डॉ. मिलिंद अहिरे, विभाग प्रमुख, कृषि विस्तार, श्री. विजय कोते, नियंत्रक हे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मा. कुलगुरु यांनी कृषि सलग्न विभागांची समन्वय ठेऊन विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर प्रभावीपणे पोहोचवावे व कृषि विज्ञान केंद्राचे कार्य जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. डॉ. कोकाटे यांनी जिल्हयातील शेतकऱ्यांचे नाविन्यपुर्ण कार्य राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याची सुचना केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते या केंद्राने शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या सातारा जिल्हयातील कृषि निविष्ठा पुरवठादारांची माहिती पुस्तीका, घडीपत्रीकांचे विमोचन करण्यात आले.

बैठकीच्या सुरवातीस केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रा. मोहन शिर्के यांनी प्रास्ताविक करुन कृषि विज्ञान केंद्राचे सन 2017-18 या सालातील विस्तार उपक्रमांचे सादरीकरण केले. तद्नंतर विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ व कार्यक्रम सहाय्यक यांनी संबंधीत विषयाचे सादरीकरण करुन सन 2018-19 मध्ये घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी केंद्रातील उपक्रमांचे कौतुक केले. या बैठकीस जिल्हयातील तसेच कृषि सलग्न विषयातील तज्ञांनी उपस्थित राहुन योग्य त्या सुचना केल्या. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक, आत्मा, कृषि विकास अधिकारी, जि. प. सातारा, अग्रणी बँक व्यवस्थापक, सहयोगी संशोधन संचालक, राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र, कोल्हापुर, कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी, सातारा, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, कालवडे तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीचे सुत्रसंचालन श्री. सागर सकटे व आभार प्रदर्शन प्रा. भुषण यादगीरवार यांनी केले.

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2019 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.