News

भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे.लोकसंख्येचा जवळजवळ 65 टक्के हिस्सा शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात शेतीत विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा आणिपद्धतींचा वापर करता यावा यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांचा उद्देश आहे की, कमीत कमी खर्चात चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळावे व त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी. अलीकडे शेतकरी आता शेतीमध्ये विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.

Updated on 19 September, 2021 7:52 PM IST

भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे.लोकसंख्येचा जवळजवळ 65 टक्के हिस्सा शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात  शेतीत विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा आणिपद्धतींचा वापर करता यावा यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांचा उद्देश आहे की, कमीत कमी खर्चात चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळावे व त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी. अलीकडे शेतकरी आता  शेतीमध्ये विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत

यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे कमी वेळेत व कमी खर्चातहोतात.त्यामुळे शेतीमध्ये यंत्रांचा वापरआता महत्त्वाचा झालाआहे. या लेखामध्ये आपण शासनाद्वारे कृषी यंत्रांवर मिळणाऱ्या अनुदानावर माहिती घेणार आहोत.

कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी असणाऱ्या योजना

  • राष्ट्रीय अन्नसुरक्षा मिशन-या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे की,कृषी क्षेत्राची उत्पादकतासुधारणे हे होय.या योजनेमध्ये प्रामुख्याने नवीन यंत्र खरेदी करण्याऐवजी जुनी यंत्रे अधिक सक्षम बनवावीत याबाबत लक्ष केंद्रित केले जाते. तुमच्याकडे असलेल्या यंत्रांचा शेतात सतत वापर केल्याने यंत्र मध्ये काही प्रमाणात कमतरता येते अशा परिस्थितीत तुम्ही राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत कृषी यंत्रणेचा लाभ घेऊ शकता.
  • नाबार्ड कर्ज योजना- नाबार्ड योजना अंतर्गत ट्रॅक्टर खरेदी वर 30 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान दिले जाते.तसेच इतर काही प्रकारच्या उपयोगी कृषी यंत्रांवर शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.त्यामुळे कृषी यंत्र शेतकऱ्यांना खूप सहज रित्या उपलब्ध होऊ शकतात.
  • कृषि यांत्रिकीकरणावर उप मिशन योजना-योजना प्रामुख्याने छोटे आणि सीमांत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडूनकृषी यांत्रिकीकरणाच्या संबंधित विविध प्रकारचेउपक्रम राबवले जातात उदा. कस्टम हायरिंग  सेंटर,हायटेक हब तसेच कृषी यंत्रणा बँक यांची स्थापना केली जाते आणि वितरणासाठी निधी जारी केला जातो.
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना-राज्य योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.कृषी हवामान,नैसर्गिक संसाधने आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून शेती विकसित करणेहा या योजनेचा हेतू आहे.या आधारावर जिल्हा आणि राज्यांसाठी कृषी योजना तयार केल्या जातात. या योजनेअंतर्गत फार्म मशिनिकरण,प्रगत आणि महिला अनुकूल उपकरणेवअवजारे यासाठी मदत दिली जाते.

 

 या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • बँकेचे स्टेटमेंट
  • पॅन कार्ड
  • संपर्क माहिती
  • नाव आणि जन्म तारीख
  • अर्ज आणि पेमेंट पावती इत्यादी.
English Summary: schemes for farmer machanisation for agri
Published on: 19 September 2021, 07:52 IST