हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. अवकाळी पावसाने तर शेतकऱ्यांच्या तोंडीआलेल्या घास अक्षरशा हिरावून घेतला आहे.
अवकाळी चे संकट काही केल्या संपता संपत नाहीये. शुक्रवारी नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव वनीगडोळ आणि निळवंडी तर निफाड तालुक्यातील कोळगाव येथे द्राक्षबागा कोसळल्याने जवळजवळ दोन हजार क्विंटल पेक्षा जास्त द्राक्ष मातीमोल झाले आहेत. यामुळे द्राक्ष ना तडे गेल्याने द्राक्षांचा दरावर याचा परिणाम होऊन 15 ते 20 रुपये प्रति किलो दराने विक्री होण्याची चिन्हे आहेत.अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे देखिल कठीण झाले आहे.
या अवकाळी पावसानेअतिवृष्टीमुळे द्राक्षचनाही तर गहू, कांदा आणि हरभरा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असल्याने नाशिक जिल्ह्यात अजूनही 40 ते 50 टक्के द्राक्ष बागा काढणीच्या प्रतीक्षेत आहेत.या पावसानेऐन काढणीला आलेल्या द्राक्षबागांचे नुकसान झाले असून द्राक्ष मण्यांना तडे जात आहेत. तयार द्राक्ष यामध्ये भिजले आहेत अशा द्राक्ष घडांना देठाजवळ तडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अजून घडांवर पाणी असल्याने जेव्हा उष्णता वाढेल तेव्हा तडे जाण्याचे प्रमाण वाढेल त्यामुळे अजून चार-पाच दिवसांनी खरे नुकसान समोर येईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.जेव्हा उष्णतेत वाढ होईल तेव्हा द्राक्षांमध्ये गोडवा उतरून ग्राहकांकडून देखील चांगली मागणी येते त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी उन्हाची तीव्रता वाढण्याची वाट पाहत आहेत.
मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये देशातील उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीसारख्या राज्यातून द्राक्षांना मागणी वाढते. जेव्हा ही मागणी वाढेल तेव्हा द्राक्ष दर स्थिर होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
Published on: 13 March 2022, 09:36 IST