सध्या राज्यात पेरण्यांच्या कामाची लगबग सुरु आहे. मात्र काही भागात पाऊस समाधानकारक न पडल्याने कामे खोळंबली आहेत. वसई तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी आता समाधानी आहेत. मात्र हे आनंदाचे वातावरण फार काळ टिकले नाही. योग्य हवामान असताना भातरोपावर खताची मात्रा देण्यासाठी युरिया खताचीच टंचाई निर्माण झाली आहे. वसई तालुक्यातील कृषी केंद्रात युरिया खत उपलब्ध नसल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.
याबाबत आमदार राजेश पाटील यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे तत्काळ युरिया खते उपलब्ध करून द्यावी असे निवेदन केले आहे. वसई तालुक्यात भातशेतीच्या पेरण्याची रोपे वीतभर वाढली आहे. अशा परिस्थिती आवश्यक असणाऱ्या पहिल्या युरिया खताचीच कृषी केंद्रात टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला आहे.
भातशेतीच्या पेरण्याची रोपे चांगली वाढावी यासाठी युरिया खत वेळेवर देणं गरजेचं आहे. आधीच पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकरी चिंतेत होता. त्यात बऱ्याच भागात पेरण्याची कामे उरकली आहेत. भाताची रोपे वाढू लागली आहेत. मात्र भाताची रोपे वाढत असताना त्यांना जर आवश्यक असणारी खत दिली गेली नाही तर रोपांची वाढ होणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
भाताच्या रोपांची वाढ होत असताना त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी युरिया खताची मात्रा योग्य वेळेत देणे आवश्यक आहे. मात्र ऐन वेळी खताची कमतरता भासू लागल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. जर युरिया खत वेळेवर दिले गेले नाही तर याचा भात पिकावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या:
नुकसान भरपाईचे दावे न्यायालयात अडकले; 3 लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित
शेतकऱ्याने वाजत गाजत काढली कांद्याची मिरवणूक; वाचा नेमकं काय आहे प्रकरण
Published on: 03 July 2022, 04:39 IST