News

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी सावकारी स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोना संकटाच्या दरम्यान मे 2020 मध्ये विशेष मुदत ठेव योजना (Fixed Deposit Scheme) सुरू केली. या अंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.30 टक्के व्याज दिले जाते

Updated on 15 October, 2021 10:38 PM IST

देशातील सर्वात मोठी सावकारी स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोना संकटाच्या दरम्यान मे 2020 मध्ये विशेष मुदत ठेव योजना (Fixed Deposit Scheme) सुरू केली. या अंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.30 टक्के व्याज दिले जाते. या योजनेचे नाव आहे एसबीआय वी केअर डिपॉझिट स्कीम असे आहे. ही योजना सप्टेंबर 2021 मध्ये संपणार होती. मात्र, आता योजनेची मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. वी केअर योजनेला एसबीआयने पाचव्यांदा मुदतवाढ दिली आहे.

वी केअर डिपॉझिट स्कीम अंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त किरकोळ मुदत ठेवींसाठी लागू व्याज दरापेक्षा 0.30 टक्के अतिरिक्त व्याज दर दिला जातो. ज्येष्ठ नागरिक वी केअर डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करून सामान्यपेक्षा 0.80 टक्के अधिक व्याज मिळवू शकता. एसबीआय सामान्य ग्राहकांपेक्षा मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज देते. बँक सध्या 5 वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.40 टक्के व्याज देत आहे.

काय आहेत अटी?

एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय वी केअर डिपॉझिट अंतर्गत प्राप्त अतिरिक्त व्याजाचा लाभ नवीन खाते आणि नूतनीकरणावर उपलब्ध होईल. तुम्ही प्री-मॅच्युरिटी विथड्रॉल केले तर तुम्हाला अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळणार नाही. एवढेच नाही तर तुम्हाला 0.50 टक्क्यांपर्यंत दंड देखील भरावा लागू शकतो.

एसबीआय सामान्यत: ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 5.90 टक्के वार्षिक व्याज देते. आता जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने वी केअर डिपॉझिट स्कीममध्ये एफडी केली असेल तर त्याला 0.30 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. दुसऱ्या शब्दांत, ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांच्या FD वर 6.20 टक्के वार्षिक व्याज मिळेल. हे दर 8 जानेवारी 2021 पासून लागू आहेत. हे व्याज दर किरकोळ मुदत ठेवींवर म्हणजेच 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर लागू आहेत.

 

डेबिट कार्डवरून जास्त पैसे खर्च केले, मग रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करा

अनेकदा शॉपिंगला गेल्यावर वस्तू खरेदी करण्याच्या नादात आपल्याला नेमक्या खर्चाचा अंदाज येत नाही. पण बिलिंग काऊंटरवर गेल्यानंतर आपण प्रमाणापेक्षा जास्त खर्च केला असे लक्षात येते. तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर पैसे तात्काळ भरावे लागतात. परंतु, त्यामुळे पुढील खर्चाचा ताळमेळ बिघडण्याची भीती असते.

अशावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या डेबिट कार्डधारकांना खास सोय देऊ केली आहे. त्यानुसार ग्राहक डेबिट कार्डवरून पूर्ण पैसे खर्च न करता ती रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करु शकता. ग्राहकपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा स्थानिक दुकानांमध्ये तुम्ही डेबिट कार्ड स्वाईप केल्यानंतर तुम्ही ईएमआय सुविधेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, Amazon किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स पोर्टलवरून खरेदी करतानाही तुम्हाला या विशेष सुविधेचा लाभ घेता येईल.

 

योजनेचा फायदा काय?

स्टेट बँकेच्या डेबिट कार्डवर केलेल्या खर्चाची रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट केल्यास तुम्हाला कोणतीही प्रोसेसिंग फी द्यावी लागणार नाही. तसेच यासाठी कोणतीही कागदपत्रे जमा करावी लागणार नाहीत. शॉपिंगची रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर तुमच्या बचत खात्यामधील लिमीट पूर्ववत होईल.

English Summary: SBI's special offer, higher interest on fixed deposit, find out what the plan is
Published on: 15 October 2021, 10:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)