News

भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. यामुळे आपल्याला घरी बसून पैसा मिळणार आहे, यासाठी आपल्याला फक्त व्हॉट्स अप मेसेज करावा लागणार आहे.

Updated on 21 August, 2020 7:29 PM IST

 

भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. यामुळे आपल्याला घरी बसून पैसा मिळणार आहे, यासाठी आपल्याला फक्त व्हॉट्स अप मेसेज करावा लागणार आहे. आपल्याला हवी असणारी रक्कम देण्यासाठी एटीएम आपल्या दराशी येणार आहे.

SBI (State Bank of India) ने आपल्या मोबाईल एटीएम Mobile ATM) मशीन घरोघरी नेण्य़ाचा निश्चय केला आहे. यासाठी एसबीआय आपल्या गरजेनुसार, एटीएम आपल्या दाराशी या सेवेला सुरुवात करत आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना सांगितले की, तुम्ही फक्त व्हॉट्स अप मेसेज करा आमचे एटीएम मशीन आपल्या दाराशी येईल. मोबाईल एटीएम घरी बोलण्यासाठी तुम्ही बँकेशी संपर्क साधू शकतात. दरम्यान एसबीआय आपली ही सेवा लखनौमध्ये सुरू केली आहे.

यासह बँकेने अजून सुविधा आपल्या ग्राहकांसाठी दिली आहे. आता मिनिमम बॅलन्स आणि एसएमएस चार्ज लागणार नाही. बँकेने आता हे शुल्क माफ केले आहे. याविषयीची माहिती एसबीआयने ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. दरम्यान एसबीआयच्या ४४ लाख कोटी ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.

English Summary: SBI's offer, ATM will come to your door after WhatsApp message
Published on: 21 August 2020, 07:28 IST