देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने तिच्या असलेल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी सुविधा देऊ केली आहे. यानुसार तुम्ही आता तुमच्या नॉमिनी व्यक्तीचे नाव घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अपडेट करू शकता.
त्यामुळे तुमच्या खात्यात तुम्ही नॉमिनी व्यक्तीचे नाव कसे समाविष्ट करू शकता हे जाणून घेऊ.
नोंदणीचे नाव खात्याला कनेक्ट करण्यासाठी तीन मार्ग आहेत त्यापैकी पहिला म्हणजे बँकेचे शाखेत जाऊन, दुसरा म्हणजे एसबीआय नेट बँकिंग द्वारे. एसबीआय मोबाईल बँकिंगद्वारे. नॉमिनीचे नाव त्याला जोडण्यासाठी एसबीआयचे ग्राहक https://onlinesbi.com लॉग इन करू शकता.
अशा पद्धतीने नॉमिनीचे नाव अपडेट करा
-
बँकेच्या योनो लाईट एसबीआय ॲप वर लॉगिन करावे.
-
होम बटणावर क्लिक करून सर्विस रिक्वेस्ट ऑप्शनवर क्लिक करावे.
-
सर्विस रिक्वेस्टवर क्लिक केल्यानंतर ऑनलाइन नॉमिनेशनच पर्याय असलेले पेज उघडते.
-
त्यानंतर अकाउंट डिटेल सिलेक्ट करण्यासाठी क्लिक करावे आणि नॉमिनीची संपूर्ण माहिती अपडेट करावी.
-
आपणास नॉमिनी सह रिलेशनशिपची माहिती भरावी लागेल.
दुसरे म्हणजे तुम्ही online.com या संकेतस्थळाला भेट देऊन नॉमिनी व्यक्तीचे नाव अपडेट करू शकता. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर रिक्वेस्ट अँड इंक्वायरीवर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या समोर चार पर्याय दिसतात. त्या चार पर्यायांपैकी ऑनलाईन नॉमिनेशनवर क्लिक करावे. त्यानंतर नॉमिनेशनविषयी सर्व माहिती भरावी लागते. ही क्रिया पूर्ण झाल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळतो. ओटीपी व्हरिफिकेशननंतर आपले नॉमिनी नाव अपडेट केली जाते.
Published on: 06 February 2021, 01:21 IST