सरकारी नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी एक बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात विविध पदांवर भरती सुरू आहे. ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या एसबीआयमध्ये स्पेशलिस्ट केडर ऑफिसर (SCO) आणि क्लेरिकल केडरमध्ये फार्मासिस्टच्या एकूण ९२ पदांवर भरतीसाठी जाहीरात जारी करण्यात आली आहे.
बँकेद्वारे सहा विविध जाहीरातींमार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया मंगळवार १३ एप्रिल २०२१ पासून सुरू झाली आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक व योग्य उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर उपलब्ध करण्यात आले आहेत. ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येतील. सर्व पदांसाठी अर्ज प्रक्रिया आणि अर्ज शुल्क भरणे आदी प्रक्रिया उमेदवारांना ३ मे पर्यंत पूर्ण करायची आहे.
कसा करणार अर्ज?
अर्जासाठी उमेदवारांनी एसबीआयच्या वेबसाइट वर भेट दिल्यानंतर करिअर सेक्शनमध्ये जावे आणि तेथे लेटेस्ट अनाउंसमेंट्स सेक्शनमध्ये जावे. या भरती जाहीरातीसोबत अप्लाय ऑनलाइनच्या लिंक वर क्लिक करून अॅप्लिकेशन पेज वर जाता येईल. उमेदवार पुढे दिलेल्या डायरेक्ट लिंकद्वारे देखील अर्जांच्या पेज वर जाऊ शकतात.
पुढील पदांवर होणार आहे भरती -
फार्मासिस्ट – ६७ पदे
डेप्युटी सीटीओ – १ पद
मॅनेजर (हिस्ट्री) – २ पदे
चीफ एथिक्स ऑफिसर – १ पद
एडवायजर (फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट) – ४ पदे
डेप्युटी मॅनेजर (स्ट्रॅटेजिक ट्रेनिंग) – १ पद
डाटा अॅनालिस्ट – ८ पदे
मॅनेजर (रिस्क मॅनेजमेंट) – १ पद
मॅनेजर (क्रेडिट एनालिस्ट) – २ पदे
सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव (कॉम्पलीयंस) – १ पद
सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव (स्ट्रेटेजी टीएमजी) – १ पद
सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव (ग्लोबल ट्रेड) – १ पद
सीनियर एक्झिक्युटिव (रिटेल आणि सब्सीडियरीज) – १ पद
सीनियर एक्झिक्युटिव (फायनान्स) – १ पद
सीनियर एक्झिक्युटिव (मार्केटिंग) – १ पद
Published on: 15 April 2021, 05:37 IST