देशातील सर्वात मोठी असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले ग्राहक पेन्शन धारकांसाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. या सेवेचा ५४ लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. ही नवी सेवा आहे, एसबीआय पेन्शन सेवा वेबसाईट. या वेबसाईटवर लॉगिन करुन पेन्शनधारक आपल्या पेन्शनविषयी माहिती घेऊ शकतात. विशेष म्हणजे (SBI Pension seva) वेबसाइट हाताळण्यास खूप सोपी आहे. पेन्शन प्रोसेसिंगसाठी बँकेने सेंट्रल सरकारच्या डिफरेंस रेल्वे पोस्टल टेलीकॉम सिव्हील सारख्या संस्थेशी करार केला आहे.
या वेबसाइटवरुन आपण अजून इतर सेवांचा लाभ घेऊ शकता
- कॅलकुलेशन शीट डाऊनलोड करणे.
- पेंन्शन प्रोफाईलची पुर्ण माहिती
- गुंतवणुकीसंबंधी माहिती
- प्रत्येक प्रकारचे व्यवहार
- लाईफ सर्टिफिकेट स्टेटस
कसे कराल नोंदणी
एसबीआयमधील पेन्शन खाते ठेवणारे खातेधारकांना या वेवसाइटवर वापर करण्यापुर्वी स्वत ची नोंदणी करावी लागेल. यासाठी www.pensionseva.sbi वर क्लिक करावे लागेल. यानंतर नोंदणी वर टॅबवर क्लिक करुन कमीत कमी पाच कॅरेक्टर चे युझर आयडी तयार करावे. युझर आयडी क्रिएट होण्यानंतर ग्राहक त्यावर आपले पेन्शन अकाउंट नंबर टाका. त्यानंतर जन्म तारीख आणि पेन्शन पेमेंट करणारी बँक ब्रांचचा कोड टाका. आता तुम्ही आपला आयडी टाका, त्यानंतर नवा पासवर्ड तयार करा, त्याला सेव्ह करु घ्या. ही सर्व माहिती सेव्ह केल्यानंतर बँक ग्राहकांचा नोंदणी असलेला मेल आयडीवर मेल पाठवेल. ज्यात एक्टिवेशनचे लिंक असेल. अकाऊंटमध्ये एक्टिव झाल्यानंतर पेन्शनधारक नोंदणी झालेली आयडी आणि पासवर्ड टाकून वेबसाईट वर लॉगिन करु शकता. पण लक्षात ठेवा की, जर आपण तीनवेळा चुकीचा पासवर्ड टाकला तर आपले अकाउंट लॉक केले जाईल.
जर आपण बँकेच्या कोणत्या सेवेशी संतृष्ट नसाल तर आपण बँकेची तक्रार करु शकता. आणि तक्रार करण्यास UNHAPPY लिहून ८००८२०२०२० वर एसएमएस करा. याशिवाय आपण टोल फ्रि नंबर १८२०४२५३८०१०८, ०२६५९९९९० वर कॉल करून आपली तक्रार करु शकता. यासह एसबीआयच्या वेबसाइटवर जाऊन gm.customer@sbi.co.in वर इमेल पाठवू शकता.
Published on: 01 August 2020, 11:01 IST