News

भारतीय स्टेट बँकेने शेतकऱ्यांसाठी एक नवी सुविधा आणली आहे. आपल्या डिजिटल कृषी समाधान मंच, योनो YONO Krishi वर किसान क्रेडिट कार्ड समीक्षा पर्याय दिला आहे.

Updated on 15 August, 2020 5:31 PM IST


भारतीय स्टेट बँकेने शेतकऱ्यांसाठी एक नवी सुविधा आणली आहे. आपल्या डिजिटल कृषी समाधान मंच, योनो YONO Krish वर किसान क्रेडिट कार्ड समीक्षा पर्याय दिला आहे.  यातून शेतकरी  चार क्लिक करुन आपली केसीसीची मर्यादा  किती आहे याची माहिती करुन त्याप्रमाणे वापर करु शकतात.  दरम्यान  एसबीआयच्या मतानुसारया सुविधेमुळे शेतकरी आपल्या केसीसची मर्यादेत बदल करण्यास अर्ज करु शकतात. या बदलासाठी शेतकऱ्यांना बँकेत जाण्याची गरज राहणार नाही. योनो कृषीच्या समीक्षामुळे ज्या शेतकऱ्यांचे खाते आहेत अशा ७५ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला आहे.  शेतकऱ्यांना केसीसीच्या मर्यादेत बदल करण्यासाठी अर्ज करतान होणारा त्रास कमी होणार आहे. दरम्यान पीक कापणीच्या वेळी प्रक्रिया अधिक तेज होईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार, शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी साहित्य आणि इतर गरजा लवकर प्राप्त व्हव्यात यासाठी केसीसी योजना सुरु करण्यात आली आहे.  सोप्या पद्धतीने एका सिस्टमच्या अंतर्गत बँकिग प्रणालीतून शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळावेत.  ही योजना शेतकऱ्यांना  शेतीसाठी अत्पकालिन आवश्यकता पुर्ण करण्यास मदत करते. यासह कापणीनंतर खर्च, मार्केटिंग कर्ज उत्पादन, शेतकरी  कुटुंबांच्या  उपभोग गरजा, कृषी संबंधित कार्यासाठी मदत करत असते.

क्रेडिट कार्डच्या कर्जासाठी लागणारी कागदपत्रे :

क्रेडिट कार्ड कर्जाचा अर्ज आपल्या स्वाक्षरीसह , आधारकार्ड, पॅनकार्डमतदान कार्ड, आदी.  अर्जदाराचा राहण्याचा पत्ता, सातबारा उतारा किंवा शेत जमीन कसण्यासाठी घेतली असल्यास त्याचे प्रतिज्ञापत्र, पासपोर्ट साईज फोटो, कर्जासाठी तुम्ही थेट बँकेत जाऊ शकता. बँकेतील अधिकाऱ्यांकडून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ते कागदपत्र सांगतील. ती कागदपत्रे आपण जमा करु दिल्यास बँक आपल्याला कर्जाची पुर्तता करेल.  स्टेट बँकेतून जर तुम्ही कार्ड घेत असाल तर तुम्ही ऑनलाईनही यासाठी अर्ज करु शकता. https://sbi.co.in/ या संकेतस्थळावर गेल्यास आपल्याला अर्ज मिळेल.

दरम्यान पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटण्याच्या सुचना केंद्राने दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांला तीन लाखपर्यंतचे कर्ज मिळू शकते. महाराष्ट्रात २० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. मात्र केसीसी किसान क्रेडिट कार्ट वाटण्याकडे बँकांना दुर्लक्ष करत असल्याती तक्रारी येत आहेत. पीएम किसान योजनेत समावेश झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने किसान क्रेडिट कार्डचे वाटप करुन खरिपासाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करावा अशा सुचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. साधरण ६ कोटी शेतकऱ्य़ांकडेच केसीसी कार्ड आहे.

English Summary: SBI Kisan Credit Card - Bank launches YONO agricultural samiksha , limits farmers can raise
Published on: 15 August 2020, 05:30 IST