देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया नेदेशातील शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी अदानी कॅपिटलशी हात मिळवणी केली आहे. अलीकडे स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि कृषी यंत्राच्या खरेदीसाठी कर्ज देण्यासाठी अदानी समूहाची एनबीएफसी शाखा अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्ज मिळणे सोपे होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया एक कर्ज एनबीएफसी च्या सहकार्याने देईल. बँकेने याबाबतीत निवेदन जारी केले असून त्यामध्ये म्हटले आहे की,या सामंजस्य करारामुळे एसबीआय पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकरी कृषी यंत्र खरेदी करू इच्छितात अशा शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया अनेक एनबीएफसी सोबत सहकार्य करून कर्ज देण्याची प्रक्रिया वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतीय आयुर्विमा निगम अंतर्गत मिळेल वैयक्तिक कर्ज
जर तुम्ही लाईव्ह इन्शुरन्स कार्पोरेशन ग्राहक असाल व तुम्ही पॉलिसी घेतली असेल तर तुम्ही त्यावर वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकतात. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ग्राहकांना पॉलिसीवर वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन घेण्यास परवानगी देते. या पर्सनल लोनचा व्याजदर सरकारी आणि खासगी बँका पेक्षा खूपच कमी आहे.एल आय सी कडून पॉलीसीवर दिलेल्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदरनऊ टक्के पासून पासून सुरु होतो. मात्र तुम्हाला किती कर्ज मिळेल हे तुमच्या उत्पन्नावर अवलंबून आहे.
मुदतीपूर्वी पेमेंट केले तर शुल्क शून्य असणार
एलआयसी पॉलिसी वर घेतलेल्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर इतर वित्तीय संस्थांच्या तुलनेत कमी आहे.सध्याचे व्याजदरनऊ टक्के पासून सुरु होतो आणि कर्जाची मुदत पाच वर्षे आहे. येथे उपलब्ध वैयक्तिक कर्जाची खास गोष्ट म्हणजे जर तुम्ही कर्जाच्या मुदतीपूर्वी पेमेंट केले तर शुल्क शून्य आहे. म्हणजेच मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास नंतर कोणतेही वेगळे शुल्क भरावे लागत नाही.
इंस्टॉलमेंट बद्दल सांगायचे झाल्यास जर एखाद्या व्यक्तीने नऊ टक्के दराने एक लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल आणि त्याची मुदत एक वर्षासाठी निश्चित केली असेल तर आठ हजार 745 रुपयांचा इंस्टॉलमेंट लागू होईल.घर कर्ज दोन वर्षासाठी घेतले असेल तर इंस्टॉलमेंट 4568 रुपये असेल. आणि कर्ज जर पाच वर्षासाठी असेल तर इंस्टॉलमेंट रक्कम दोन हजार 76 रुपये असेल.
कर्ज कसे घ्याल?
जर तुम्हाला एलआयसी पॉलिसी वर वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही एलआयसीच्या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता. तेथे तुम्ही कर्जासाठी अर्ज देखील करू शकता. ऑनलाइन फॉर्म भरा आणि डाऊनलोड करा. भरलेल्या फार्म वर स्वाक्षरी केल्यानंतर तो स्कॅन करा आणि एलआयसी वेबसाईटवर अपलोड करा. त्यानंतर तुमच्या अर्जाची विमा महामंडळाकडून पडताळणी केली जाईल आणि कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केले जाईल.(संदर्भ- मी E शेतकरी)
Published on: 14 December 2021, 04:57 IST