News

सोशल मीडिया जितका चांगला तितकाच वाईट आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज येत असतात. यात काही बँकेचे असतात, यातून अनेकांची फसवणूक होत असते. यासाठी एसबीआयने आताच्या काळामध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून सतर्क राहण्यासाठी ग्राहकांना अलर्ट केले आहे.

Updated on 11 November, 2020 3:36 PM IST


सोशल मीडिया जितका चांगला तितकाच वाईट आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज येत असतात.यात काही बँकेचे असतात, यातून अनेकांची फसवणूक होत असते.यासाठी एसबीआयने आताच्या काळामध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून सतर्क राहण्यासाठी ग्राहकांना अलर्ट केले आहे.भारतातील सगळ्यात मोठी सरकारी बँक (एसबीआय) स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेधारकांना अलर्ट केले आहे कि, सोशल मीडियावर येणार्‍या बँकेच्या कोणत्याही प्रकारच्या फेक मेसेजच्या चक्करमध्ये पडू नये. सोशल मीडियावर अनेकजण फसवणूक करणारे मेसेज पाठवतात बँक ग्राहकांना कुठल्याही प्रकारची असले मेसेज पाठवत नाही.

सोशल मीडियावर रहावे सतर्क

 स्टेट बँकेने ट्विट करून ग्राहकांना सावधान केले आहे. बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ग्राहकांना विनंती आहे की, सोशल मीडियापासून सावधान राहून कोणत्याही प्रकारच्या भ्रमक आणि फसव्या मेसेजच्या जाळ्यात येऊ नये. बँकेने म्हटले कि, या गोष्टींनीवर तुम्ही लक्ष दिले नाही तर तुमचे बँक खाते हे रिकामे होऊ शकते.

 कोणालाही आपल्या बँकेविषयी पर्सनल डिटेल्स शेअर करू नका

याबरोबरच ग्राहकांनी कुणालाही आपली पर्सनल डिटेल्स शेअर करू नये. शेअर केल्यामुळे एक ग्राहकांनी त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली रक्कम गायब होऊ शकते. बँकेने म्हटले की, आपणा एटीएम पीन, अकाउंट नंबर आणि ओटीपी कुणालाही शेअर करू नये.

 

बनावट वेबसाइटसाठी केला होता अलर्ट

 ग्राहकांना बँकेने सुचित केले की, त्याच्या नावाने सुरू केलेल्या बनावट वेबसाईटच्या बाबतीतही अलर्ट जारी केला होता. यांनी म्हटले होते की, बँकेच्या ग्राहकांनी असले मेसेज वर लक्ष देऊ नये. जे वेबसाईटवर पासवर्ड आणि अकाउंट विषयी माहिती अपडेट करण्याच्या सांगतात. असल्या वेबसाईट दुर्लक्षित कराव्या.

 


स्टेट बँकेचे ग्राहक पुढीलप्रमाणे चेक करा बँक बॅलन्स चेक

 एसबीआयचा बॅलन्स माहीत करून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून टोल फ्री नंबर 9223766666 या नंबर वर मिस कॉल करावा. तसेच मेसेज द्वारे बॅलन्स माहिती करून घेण्यासाठी 09223766666 त्या नंबर असा मेसेज पाठवून बॅलन्स विषयी माहिती मेसेजद्वारे दिले जाते. परंतु यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंट ची रजिस्टर असणे आवश्यक आहे.

English Summary: SBI alerts 42 crore customers; Don't do this by mistake
Published on: 11 November 2020, 03:36 IST