News

सध्याच्या महागाईच्या दिवसात पैशाची बचत करणे खूप अवघड ठरत असत. दवाखाना किंवा इतर गोष्टींसाठी मोठा पैसा खर्च होत असतो. यामुळे पैसा वाचणं मोठ जिकरीचे काम ठरते.

Updated on 25 December, 2020 3:38 PM IST

 

सध्याच्या महागाईच्या दिवसात पैशाची बचत करणे खूप अवघड ठरत असत. दवाखाना किंवा इतर गोष्टींसाठी मोठा पैसा खर्च होत असतो. यामुळे पैसा वाचणं मोठ जिकरीचे काम ठरते. ग्राहकांची ही समस्या लक्षात घेत विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणजे भारतीय जीवन बिमा निगम, ही कंपनी सर्वात लोकप्रिय आणि विश्वसनीय कंपनी आहे. एलआयसीच्या वेगळ्या पॉलिसी अंतर्गत तुम्ही अगदी कमी पैशांमध्ये जास्तीची बचत करू शकतात. अशाच प्रकारच्या बऱ्याच योजना एलआयसीचा आहेत.त्यापैकीच एक जीवन उमंग योजना..

या योजनेअंतर्गत अगदी तीन महिन्यांच्या बालकांपासून ते 55 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेचा विमा कव्हर चा जर विचार केला तर शंभर वर्षा पर्यंत विमा कव्हर मिळते. या योजनेचा वार्षिक हप्ता 15 हजार 298 रुपये या योजनेत तुम्ही 1302 रुपये जमा करू शकतात.

 

या पॉलिसीचा कालावधी तीस वर्षांसाठी असून या सगळ्या ३० वर्षांमध्ये एकूण ४ लाख 58 हजार 940 रुपये जमा करावे लागतात. याच्या बरोबर एक वर्षानंतर तुम्हाला 40 हजार रुपये मिळणार. जर तुम्ही शंभर वर्षांचा हिशोब केला या पॉलिसीमध्ये 40 लाख रुपये जमा होतात. यात तुम्हाला 28 लाख रुपये रिटर्न येणार आहेत. व्यक्तीचे वय एकशे एक वर्ष झाले तर 62. 95 लाख म्हणजे 63 लाख रुपये वेगळे मिळतात. या योजनेची अधिक माहिती करून घेण्यासाठी तुम्ही आपल्या जवळची बँक किंवा एलआयसी एजंट संपर्क साधू शकतात.

English Summary: Save money through Jeevan Umang Yojana, even people above 55 years of age can get benefits
Published on: 25 December 2020, 03:35 IST