News

गायरान जमिनीवरील अतिक्रमणे (Grazing Land Encroachment) हा एक महत्वाच्या विषय झाला आहे. यासाठी अनेकदा आंदोलने होत आहेत. अतिक्रमणे काढल्यामुळे अनेक कुटुंब भूमिहिन आणि बेघर होतील. यामुळे आता परभणी येथे विविध संघटनांतर्फे आयोजित गायरान हक्क परिषदेत अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.

Updated on 27 December, 2022 1:17 PM IST

गायरान जमिनीवरील अतिक्रमणे (Grazing Land Encroachment) हा एक महत्वाच्या विषय झाला आहे. यासाठी अनेकदा आंदोलने होत आहेत. अतिक्रमणे काढल्यामुळे अनेक कुटुंब भूमिहिन आणि बेघर होतील.यामुळे आता परभणी येथे विविध संघटनांतर्फे आयोजित गायरान हक्क परिषदेत अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.

या जमिनीवरील घरासाठी तसेच शेतीसाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकुल करावीत. शेती करणाऱ्या कास्तकारांना मालकी सातबारा (Satbara) देण्यात यावा. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी चुकीच्या नोटीस दिल्याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्योजकांना वाट्टेल त्या सवलतीने जमिनी दिल्या जातात. गायरान जमीन हक्कासाठी तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन केले जाईल. गायरान जमीन हक्कासाठी लढा तीव्र केला जाईल, असे जय किसान आंदोलनाचे सुभाष लोमटे म्हणाले. शासकीय जमिनीवर १९९५ पूर्वी राहात असलेल्या पारधी, दलित, आदिवासी कुटुंबांना राहत्या घराखालील जमिनीचे ८ अ चे उतारे कुटुंबाच्या नावे करावेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची तब्येत बिघडली, एम्स रुग्णालयात दाखल

तसेच गायरान, वन, देवस्थान जमिनीवर पेरणी केलेल्या पिकांची व कास्तकारांना महसूल अधिनियमानुसार अर्जाप्रमाणे पंचनामा करावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. विहितीखाली आणलेल्या गायरान जमिनीवर पेरणी केलेल्या पिकांचे विशेष पथके नेमून पंचनामा करून दंडात्मक कार्यवाही करून भाग अधिकार मूल्य घेऊन एक ई ला नोंद घेण्यात यावी.

मदर डेअरीकडून दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ

यावेळी जमीन अधिकार आंदोलनाचे अध्यक्ष विश्वनाथ तोडकर, जय किसान आंदोलनाचे सुभाष लोमटे, समाजवादी जनपरिषदेचे आप्पाराव मोरताटे, स्वराज इंडियाचे गोविंद गिरी, लाल सेनेचे कॉ. गणपत भिसे, प्रवीण कनकुटे, विश्वनाथ गवारे, विठ्ठल घुले, बायजाबाई घोडे, निर्मला भालके तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या;
India Post Recruitment 2023: तरुणांनो लागा कामाला! टपाल विभागात 98 हजारांहून अधिक पदांची भरती..
आता शेतकऱ्यांना फक्त मिस कॉल आणि मेसेज द्वारे मिळेल कृषी लोन, करा फक्त 'हे' काम..
इलेक्ट्रिक कारच्या किमती नवीन वर्षात वाढणार, जाणून घ्या कारण..

English Summary: Satbara in favor of farmers on Gayran land, demand in Gayran rights council
Published on: 27 December 2022, 01:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)