ग्रामीण भागात असलेल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच गावांमध्ये रखडलेली विकासकामे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी आता राज्यात दर तीन महिन्यांनी तालुकास्तरावर सरपंच सभेचे आयोजन करण्यात येईल.
पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील गावांचे सरपंच यांच्यासोबत चर्चा करून जनतेच्या समस्या ऐकून त्या मार्गी ठेवण्याबाबत कार्यवाही करावी अशा आशयाच्या सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होत नसलेबाबत वेळोवेळी शासनाचे निवेदन प्राप्त होत असतात या गोष्टी लक्षात घेऊन राज्यातील सर्व जिल्ह्यात तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्यामार्फत सरपंच सभा घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सभेत संबंधित विस्ताराधिकारी, इतर कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेण्यात येईल.
ही सभा दर तीन महिन्यांनी आयोजित करावी ज्या दिवशी तक्रार निवारण दिन असतो त्या दिवशी या सभेचे आयोजन करावे. प्रकाश आदेश देण्यात आले आहेत.
Published on: 11 February 2021, 05:30 IST