आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येतेय. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीची (ED) टीम पोहोचली आहे. पत्राचाळ प्रकरणात सध्या राऊतांची त्यांच्या भांडूपमधल्या मैत्री या घरी चौकशी सुरू आहे. सध्या संजय राऊत, त्यांच्या पत्नी वर्षा आणि बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांच्यासह ही चौकशी सुरू आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं आहे. दरम्यान, त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले असून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
हे ही वाचा: ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य म्हणाले, शिवसेना सोडणार...
काय आहे प्रकरण?
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणात सध्या राऊतांची त्यांच्या भांडूपमधल्या मैत्री या घरी चौकशी सुरू आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
काही दिवसांपूर्वी त्यांना धमकी आणि शिविगाळ होत असलेली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यातील आवाज हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा असल्याची चर्चा होती. या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा: संजय राऊत यांना अटक होणार? घरी ईडीचे पथक दाखल
हे ही वाचा: "या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करावी"; रूपाली ठोंबरे पाटलांची राज्यपालांवर जहरी टीका
Published on: 31 July 2022, 03:47 IST