News

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत चर्चेत आहेत. तसेच त्यांची चौकशी देखील सुरु आहे. आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि शिवसेना यांच्यातल राजकीय वैर खूपच पेटले आहे. यामुळे याची सतत चर्चा सुरु आहे. असे असताना आता नवनीत राणा यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Updated on 20 July, 2022 6:19 PM IST

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत चर्चेत आहेत. तसेच त्यांची चौकशी देखील सुरु आहे. आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि शिवसेना यांच्यातल राजकीय वैर खूपच पेटले आहे. यामुळे याची सतत चर्चा सुरु आहे. असे असताना आता नवनीत राणा यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

त्या म्हणाल्या की, संजय पांडे यांच्या नंतर आता पुढचा नंबर शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांचा आहे. या दोघांना अटक होणार, असे विधान नवनीत राणा यांनी केले आहे. त्यामुळे आता पुन्हा नावात पेटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिल परब आणि संजय राऊत यांची चौकशी सुरु आहे.

जेव्हा ईडी कुणावरती कारवाई करते, तेव्हा ती पूर्ण पुरावे आणि साक्षीनिशी करते. पुराव्याशिवाय ईडीकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यानंतर महाराष्ट्रात खूप नेत्यांचे नंबर येणार आहेत. अनिल परब यांना पुन्हा पुन्हा चौकशीला बोलावले जात आहे. तसेच संजय राऊत यांचीही अनेकदा ईडीकडून चौकशी झाली आहे. त्यांना ईडीचे अनेकदा नोटीसा येत आहेत.

ब्रेकिंग! रानिल विक्रमसिंघे होणार श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती

आता संजय पांडे जेलमध्ये गेले आहेत. त्यानंतर यांचा आता नक्कीच नंबर लागणार आहे, असे राणा यांनी म्हटले आहे. यामुळे आता चर्चा सुरु आहे. राज्यातील सत्ता गेल्यानंतर संजय राऊत भाजपवर दररोज टीका करत आहेत. यामुळे शिवसेना आणि भाजपचा दररोज सामना बघायला मिळत आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निधी वितरीत, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मोठी बातमी! ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले, निवडणुका घेण्याचे कोर्टाचे आदेश
आता काही दिवस पावसाची विश्रांती! 'या' तारखेला पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, पंजाबरावांनी व्यक्त केला अंदाज...

English Summary: Sanjay Raut and Anil Parab will be arrested soon
Published on: 20 July 2022, 06:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)