News

कांद्याचे आगार म्हणून विश्व प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही भामट्यांनी अनुदानाचे आमिष दाखवून लाखोंचे चंदन लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव चांदवड देवळा या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना तब्बल 60 लाखांचा गंडा घातला गेला आहे.

Updated on 23 February, 2022 2:55 PM IST

कांद्याचे आगार म्हणून विश्व प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही भामट्यांनी अनुदानाचे आमिष दाखवून लाखोंचे चंदन लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव चांदवड देवळा या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना तब्बल 60 लाखांचा गंडा घातला गेला आहे.

सध्या संपूर्ण देशात चंदन तस्कर वर आधारित पुष्पा पिक्चर प्रचंड गाजतोय, या पिक्चर मुळे अनेकांना लाल चंदन मोठे आकर्षित करीत आहे. याचाच फायदा घेत काही भामट्यांनी "आम्ही तामिळनाडू राज्यातून आलो आहोत आणि आम्ही लाल चंदन लागवडीसाठी आपणास भरघोस अनुदान देऊ" अशी बतावणी करत लाखो रुपयांचा गंडा लावला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रडण्यासाठी मजूर सापडत नाही अशी परिस्थिती झाली आहे. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे चालू हंगामात कांद्याला अधिक दर प्राप्त झाल्याने चांगली मोठी रक्कम जमा झाली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी अधिक उत्पन्नाच्या आशेपोटी आपला बराचसा पैसा या भामट्याना देऊन टाकला. या भामट्यांच्या बतावणीला फसून शेतकरी बांधवांनी चांगली मोठी रक्कम गुंतवली आहे त्यामुळे या शेतकरी बांधवांनी आपला विश्वास घात झाल्याचे समजताच बुडालेला पैसा परत मिळावा या आशेने प्रशासनाकडे आर्त विनवणी केली आहे.

काही भामट्यांनी चंदन लागवडीसाठी अनुदान मिळवून देऊ असे म्हणत नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना लाखोंचा चुना लावला आहे, या भामट्यांनी श्री लक्ष्मी गणपती नर्सरी नामक कंपनी स्थापन केली आणि देवळा मालेगाव चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देऊ असे म्हणत रक्त चंदनाची लागवड करण्याचे आमिष दाखवले. आपणास भरपूर अनुदान मिळेल अशी आशा बाळगून या तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी 60 लाख रुपये या भामट्यांना देऊ केले. या लोकांनी एक नामी शक्कल लढवत दोनशे रुपयाचे चंदनाची रोपे विकत घेतल्यास आपणास जवळपास वीस हजार रुपये अनुदान उपलब्ध करून देऊ असे सांगितले, विशेष म्हणजे या अज्ञात लोकांनी ही एक सरकारी अनुदानाची योजना असल्याची बतावणी केली त्यामुळे भोळेभाबडे शेतकरी बांधव या बतावणीला गळे पडले आणि लाखो रुपयांचा शेतकर्‍यांना गंडा लागला.

या अज्ञात लोकांनी रक्तचंदन लावण्यासाठी सरकार अनुदान देत आहे असे सांगितले एवढेच नाही जर तुम्ही अधिक चंदनाची रोपे विकत घेतली तर आम्ही आपणास बोरवेल तयार करून देऊ तसेच तारेचे कुंपण आपल्या शेतात लावू असे देखील बतावणी केली. एवढेच नाही तर तयार झालेले चंदनाचे उत्पादन देखील आम्ही खरेदी करू असे सांगितले. या अज्ञात लोकांच्या या बतावणीला हे शेतकरी बळी पडलेत आणि लाखो रुपयांचे त्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना अशा लोकांपासून सावध राहण्याचे सांगितले. हे भामटे चांगली मोठी रक्कम या तालुक्यातून जमा करून सध्या फरार झाले आहेत. या भामट्यांच्या बतावणीला फसलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे परत मिळावे म्हणून सरकारकडे विनवणी केली आहे.

English Summary: sandalwood subsidy fraud in nashik
Published on: 23 February 2022, 02:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)