राज्यात नुकताच समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवून रोडची पाहणी केली.
हा महामार्ग अनेक कारणाने चर्चेत आहे. या महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध होता. मात्र कालांतराने हा विरोध मावळला. हा महामार्ग तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी किंमत देवून या जमिनी खरेदी करण्यात आल्या. यामुळे शेतकरी रातोरात करोडपती झाले.
अहमदनगर जिल्ह्यातील धोत्रा (कोपरगाव) येथील शेतकरी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की, यापूर्वी आम्ही या प्रकल्पाला विरोध करण्याचा विचार केला होता. याचे कारण म्हणजे, 2004 साली कालवा बांधण्यासाठी त्यांची 4 गुंठे जमीन शासनाने घेतली होती, मात्र आजही नुकसान भरपाई मिळाली नाही.
गरिबांना मोफत रेशन देण्याचा केंद्राचा निर्णय, 81 कोटी नागरिकांना होणार फायदा
2017 मध्ये आमच्या बँकेत 98 लाख रुपये जमा झाले. 2018 मध्ये सरकारने त्यांच्याकडून 11 गुंठे जमीन घेतली. या रकमेतून त्यांनी 10 एकर जमीन खरेदी केली आहे. छान घर बनवले आणि एका आलीशान गाडी घेतली.
शेतकऱ्यांचे 100 टन उसाचे उत्पन्न बघून शरद पवारांनी लावला थेट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला फोन आणि...
त्यांना जमिनीच्या रेडी रेकनर दरापेक्षा 10 पट जास्त पैसे मिळाले आहेत. असेच अनेकांचे अनुभव आहेत. काहींची एक एकर जमीन गेली त्यांनी 10 एकर घेतली. काहींनी बंगले बांधले गाड्या घेतल्या, काहींनी मात्र मौज मजा करून पैसे उडवले.
महत्वाच्या बातम्या;
जमिनीचा ताबा मिळावा म्हणून स्वतःलाच जमिनीत गाडून घेतले, शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन
ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
उगीच कोणी शेतकरीराजा म्हणत नाही!! शेतकरी घालतोय हार्ले डेव्हिडसनवर दूध, बघणारे गेलेत कोमात
Published on: 03 January 2023, 01:31 IST