News

सरकारने गेल्या महिन्यात धान्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय साठ्यातून गहू आणि तांदूळ विक्रीची घोषणा केली होती. त्यानुसार, ई-लिलावात 1.66 लाख टन गहू आणि 0.17 लाख टन तांदूळ विकला आहे.

Updated on 12 September, 2023 10:55 AM IST

नवी दिल्ली :

भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील अन्न महामंडळाने (FCI) किरकोळ किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत गेल्या आठवड्यात 11 व्या ई-लिलावाद्वारे 1.66 लाख टन गहू खरेदी केला आहे. तर 17 हजार टन तांदूळ विकला आहे.

सरकारने गेल्या महिन्यात धान्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय साठ्यातून गहू आणि तांदूळ विक्रीची घोषणा केली होती. त्यानुसार, ई-लिलावात 1.66 लाख टन गहू आणि 0.17 लाख टन तांदूळ विकला आहे.

गहू आणि तांदूळच्या किंमती वाढल्याने सरकारकडून किरकोळ बाजारातील किमती कमी करण्यासाठी आणि विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी FCI खरेदीदाराला जास्तीत जास्त 100 टन गहू आणि 1,000 टन तांदूळ देऊ करत आहे, अशीही माहिती मंत्रालयाने दिली आहे. हा निर्णय लहान आणि किरकोळ वापरकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

सध्या किरकोळ बाजारात गव्हाची किंमत 30 रुपये प्रतिकिलो आहे तर गहू पीठ 35 रुपये किलो आहे. तसंच तांदूळ निर्यातबंदीनंतरही बाजारात अद्यापही तांदळाचे भाव अजूनही चढेच आहेत. 10 सप्टेंबरपर्यंत, अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 42.26 रुपये प्रति किलो होती, जी एका वर्षापूर्वी याच कालावधीत 37.44 रुपये प्रति किलो होती.

English Summary: Sale of Rice Wheat by Food Corporation of India
Published on: 12 September 2023, 10:55 IST