News

पाण्याचा सुयोग्य वापर करून गावांचा आणि शहरांचा विकासात्मक समृद्धी व्हावी

Updated on 31 January, 2023 9:39 AM IST

पाण्याचा सुयोग्य वापर करून गावांचा आणि शहरांचा विकासात्मक समृद्धी व्हावी अर्थात जल संधारणातून ग्राम समृद्धीकडे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जलतारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाचे आयोजक सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स हे असून या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती गुरुदेव श्री श्री रविशंकर जी (आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते सद्गुरु परमपूज्य) त्याचबरोबर मा. ना श्री. एकनाथजी शिंदे साहेब (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) हे आहेत.

जलतारा या भव्य दिव्य शेतकरी मेळावा कार्यक्रमाच्या माध्यमातून वरद क्रॉप सायन्स व सलाम किसान यांच्या संयुक्त विद्यमाने वाटुर येथे शेतकऱ्यांच्या मनातील, शेतकऱ्यांना हव्या त्या सेवा देणार आहेत.They are going to provide the services that the farmers want. तरी सदर कार्यक्रमास आपण हजेरी लावावी ही आग्रहाची विनंती सलाम किसान कडून केले जाणार मोफत माती परीक्षण सलाम किसान हि एक चळवळ आहे. कृषी क्षेत्रासाठी लक्ष वेधून घेणारी चळवळ. याच चळवळीद्वारे शेतकऱ्यानी प्रगत आणि आधुनिक

तंत्राद्यानाचा वापर करून शेती कशी केली पाहिजे ज्यामुळे शेतीला लागणार खर्च कमी होईल व शेतकऱ्याला उत्त्पन्न जास्त मिळेल यावर प्रकाश टाकत आहे. हे एक मोबाईल किंवा वेब एप्लीकेशन आहे. शेतकरी आर्थिक परिस्थितीने सक्षम त्याचप्रमाणे मनाने समाधानी आणि आनंदी होईल याकडे मोठा भर दिला जाणार आहे.सलाम किसान हे काही दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी अप्रतिम सेवा देत आहे यामध्ये प्रामुख्याने. सातत्याने हवामान अंदाजद्वारे शेतकऱ्याला दररोज बदलणाऱ्या

हवामान अंदाजाबाबत माहिती मिळेल, पीक दिनदर्शिकाद्वारे शेतकऱ्याला पिकांबद्दल लागवडीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल, कमी वेळेत व कमी खर्चात मातीचे परीक्षण करता येणार, ड्रोनमुळे शेतात फवारणी करणे सोपी होईल, कीड व रोग शोधून त्यावर नियंत्रण करता येईल, शेतीबद्दल वेळोवेळी कृषी तज्ज्ञानंचा सल्ला घेता येणार, शेतकऱ्याला बाजारा बद्दल तसेच दररोज बदलणाऱ्या बाजार भावाबद्दल माहिती मिळेल, दळणवणासाठी लागणाऱ्या वाहतुकीचा प्रश्न मिटेल,

शेतमालाच्या साठवणुकीसाठी गोदाम व्यवस्था त्याचबरोबर शीतगृह ही उपलब्ध असणार आहेत. अशा बऱ्याचशा सेवा सलाम किसान देत आहे.सलाम किसान कडून मोफत माती परीक्षण केले जाणार आहे.यात साधारपणे जमिनीचा सामू (पीएच) विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, जस्त, तांबे, मंगल आणि बोरॉन या गुणधर्मासाठी मातीचे परीक्षण केले जाते. त्यानुसार वरील अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण या बाबत माहिती

मिळते. त्यामुळे आपल्या शेतातल्या मातीची नेमके दुखणे काय आहे हे आपल्याला कळू शकेल आणि आपल्याला त्यावर उपाययोजना करता येतील.त्यासाठी मातीचा नमुना साधारणतः पिकाची कापणी झाल्यानंतर घ्यावा, खत घातल्यानंतर तीन महिन्यांच्या आत नमुना घेऊ नये, शेतात पीक असताना मातीचा नमुना दोन ओळींच्या मधल्या जागेतून घ्यावा, एक एकर क्षेत्रातून पाच वेगवेगळ्या ठिकाणावरून आणि झाडाखालील व बांधा जवळील माती घेण्यास टाळावी, त्यांनंतर टिकाव, फावडे,

खुरपे, घमेले किंवा गिरमिट याचा वापर करून माती घ्यावी त्यांनतर स्वच्छ कापडी पिशवीमध्ये भरून त्या पिशवीवर आपले गाव, मो - नंबर, सर्वे नंबर, शेतकऱ्याचे नाव या पद्धतीने लिहून त्यावर चिट्टी चीटकवावी.आणि हा नमुना घेऊन कार्यक्रमास यावे त्यानंतर काही दिवसातच आपल्या व्हाट्सअप नंबर वर आपल्या मातीच्या नमुन्याचा तपासणी करून निकाल व माहिती कळवण्यात येईल.त्यमुळे या भव्य शेतकरी मेळावा कार्यक्रमामध्ये हजारो लाखोच्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती लावावी असे आवाहन सलाम किसन आणि वरद क्रॉप सायन्स या समुहांकडून केले जात आहे.

English Summary: Salam Kisan's appeal to participate in Jaltara Shektar Mela and get free soil testing
Published on: 31 January 2023, 09:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)