दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दीवाळीपूर्वी पीक विम्याची मदत मिळवून दिली नाही, तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही,अशी प्रतिज्ञा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. आता शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत असल्याने एका शेतकऱ्याने धनंजय मुंडे यांना पत्र लिहीले आहे. 'साहेब पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत, आता दिवाळी साजरी करा' अशी भावनिक साद पत्राच्या माध्यमातून शेतकऱ्याने घातली आहे.
यावर्षी राज्य सरकारनं एका रुपयात पीक विमा देण्याची घोषणा करुन त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. मात्र पिक विमा कंपन्यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करत विम्याबाबत चाल अपील केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ देण्याचे मान्य करून रक्कम शेतकऱ्यांनाच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच 1700 कोटी रुपये राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
दरम्यान एका शेतकऱ्याने धनंजय मुंडे यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. आपण शब्द पाळला, खरा करुन दाखवला असे शेतकऱ्याने म्हटले आहे. प्रधानमंत्री पीकवीमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, तर मीसुद्धा दिवाळी साजरी करणार नाही. तेव्हाच आम्हाला वाटले की आमच्या घरातीलच कोणी कृषी मंत्रीपदावर विराजमान आहे असे शेतकऱ्यानी पत्रात लिहीले आहे. या पत्रासोबत त्यांनी दिवाळीची भेट वस्तू देऊन धनंजय मुंडे यांना आता आपणही दिवाळी साजरी करा अशी साद घातली.
Published on: 10 November 2023, 06:32 IST