News

राज्यात दूध दर आणि दूध पावडर आयातीचा निर्णयावरुन राज्यात आंदोलन पेटले. विरोधी पक्ष भाजप आणि राज्यातील इतर शेतकरी संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.

Updated on 14 August, 2020 11:58 PM IST


राज्यात दूध दर आणि दूध पावडर आयातीचा निर्णयावरुन राज्यात आंदोलन पेटले. विरोधी पक्ष भाजप आणि राज्यातील इतर शेतकरी संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही शिरोळ इथं देवाला दुधानं अभिषेक घालत आंदोलनाला सुरुवात केली. राजू शेट्टी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. भाजपनेही सरकारकडे दूध दरवाढीसाठी निवदेन दिले. पण सरकारने या आंदोलनाकडे पुर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

यादरम्यान राजू शेट्टी यांना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या फोन कॉलची आठवण झाली.  ही गोष्टी  आहे, २००७ सालची यावर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेने दूध दराविषयी आंदोलन केले होते. राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कशी तत्परता दाखवली याची आठवण त्यांनी आज बोलून दाखवली.  राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनाचा आवाज थेट अमेरिकेपर्यंत पोहोचला होता.  या आंदोलनाची आठवणीची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. आपल्या पोस्ट ते म्हणतात, २ जुलै २००७ रात्रीचे दोन वाजता माझा मोबाईल वाजला “राजू मी विलासराव बोलतोय सध्या मी अमेरीकेत आहे.उद्या आर आर यांचेशी  दूध दरासंदर्भात चर्चा करून आंदोलन मागे घ्या मी राज्यात आल्याबरोबर निर्णय घेतो आणि त्यांनी निर्णय  घेतला सुध्दा. साहेब आज तुमची अनुपस्थिती जाणवते.  स्व.विलासराव देशमुख यांना विनम्र अभिवादन.

दरम्यान १ ऑगस्ट रोजी राज्यात दूध आणि दूध पावडर आयातविरोधात आंदोलन झाले.  या आंदोलनाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी  दूध रस्त्यावर ओतून  देण्याच्या घटना घडल्या.  दरम्यान  आंदोलनाच्या नेत्यांसोबत दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी चर्चा केली.   मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे आश्वसन केदार यांनी दिले. पण अद्याप काही घडल्याचे चित्र दिसत नाही. सरकारने थेट उत्पादकांच्या खात्यावर अनुदान जमा करावे, शासनाने ठरवलेल्या २७  रुपयांचा भाव देणाऱ्यांनाच अनुदान दिले जावे. शिल्लक  दूध पावडरबाबत केंद्राशी बोलून पाठपुरावा करावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

English Summary: Saheb feels your absence today, Raju Shetty recalled Vilasrao Deshmukh
Published on: 14 August 2020, 11:56 IST