अफगाणिस्तान देशात ज्यावेळी तालिबानी ने आपला कब्जा केला त्या नंतर जागतिक बाजारपेठेत केशरचा भाव आकाशाला जाऊन थेटला. मागील काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात केशरची किमंत १.४ लाख रुपये प्रति किलो आहे जे की आता पहायले गेले तर केशरची प्रति किलो ची किमंत २.२५ लाख रुपये आहे.केशर उत्पादन आणि निर्यातिची बाबतीतअफगाणिस्तान हा देश तिसऱ्या नंबर वर आहे जे की भारत देश पहिल्या नंबर वर आहे आणि दुसरा देश इराण आहे.परंतु अफगाणिस्तान मध्ये तालिबानी राजवट आल्यामुळे तेथील व्यापार पूर्णपणे बंद झाला आणि त्यामुळे जागतिक बाजारपेठेत केशर चा तुटवडा निर्माण झाला.
बाजारात केशरची किमंत आणखी वाढू शकेल:
जम्मू काश्मीर राज्यातील चार जिल्ह्यात केशर(saffron) ची लागवड केली जाते. किश्तवाड, श्रीनगर, पुलवामा, बडगाम तसेच पुलवामा जिल्ह्यातील पंपुर मध्ये उत्तम दर्जाचे केशर पिकवले जाते. काश्मीर च्या खोऱ्यात १२ मेट्रिक टन केशर तयार होते जे केशर औषधे तसेच परफ्युम, अन्न आणि रंग तयार करण्यासाठी वापरली जाते.भारतीय केशराची निर्यात आखाती देशामध्ये तसेच अमेरिका, बेल्जियम, न्यूझीलंड, कॅनडा मध्ये होते. पंपोर येथे राहणारे व्यापारी वर्गाने Tv9 हिंदी ला सांगितले की पहिली केशर ची किमंत १.४ लाख रुपये प्रति किलो आहे. आता च्या स्थितीत केशर ची किमंत २.२५ लाख रुपये प्रति किलो आहे. जर अफगाणिस्तान मधील परिस्थिती लवकर सुधारली नाही आणि तिथे निर्यात सुरू झाली नाही तर बाजारात केशर ची किमंत आणखी वाढू शकेल त्यामुळे आम्ही आता आणि पुढे सुद्धा नफ्यात राहणार आहे.
हेही वाचा:बहुमजली पीक पद्धती कशा प्रकारे घ्यायची आणि त्याचे फायदे
केशराच्या उत्पादनात वाढ:
मागील वर्षाचा जर कल पाहिला तर यावर्षात जम्मू काश्मीर मध्ये केशराचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि यामध्ये महत्वाची भूमिका राष्ट्रीय केशर मिशनची आहे. मागील काही दिवसांपूर्वी प्रति एकरात १.८ किलो केशराचे उत्पादन निघत होते जे की आता ४.५ किलो वर उत्पादन पोहचले आहे. देशात केशराची मागणी इराण आणि अफगाणिस्तान मधून आयात झालेल्या केशरातून पूर्ण केली जाते.२०१० पासून अफगाणिस्तान मध्ये केशराची लागवड करणे सुरू झाले आणि त्यामध्ये सातत्याने वाढ च होत गेली.
भारतात केशराचे किती उत्पादन?
केशर ची लागवड मे महिन्यात सुरू होते आणि ते ऑक्टोम्बर पर्यंत पीक तयार होते. भारत देशात सुमारे ५००० एकरात केशर ची लागवड केली जाते.जम्मू काश्मीर कृषी विभागाच्या माहिती नुसार दरवर्षी राज्यात १७० क्विंटल केशर चे उत्पादन होते. सध्याच्या स्थितीत राज्यात सुमारे ३७०० एकर मध्ये केशर ची लागवड केली जाते.
Published on: 19 September 2021, 02:52 IST