News

हरियाणातील दोन शेतकरी बांधवांच्या यशाची कहाणी समोर आली आहे. या शेतकरी बंधुंनी स्वत:च्या घराच्या छतावर अवघ्या १५ फुटाच्या जागेत केसरची यशस्वी शेती करत लाखो रुपये कमवल्याची माहिती समोर आली आहे लॉकडाऊन काळात हिसार जिल्ह्याच्या कोथकला गावात राहणाऱ्या नवीन आणि प्रवीण या दोघी भावांनी आपल्या घराच्या छतावर केसरची शेती सुरू केली.

Updated on 11 March, 2021 6:52 PM IST

  हरियाणातील दोन शेतकरी बांधवांच्या यशाची कहाणी समोर आली आहे. या शेतकरी बंधुंनी स्वत:च्या घराच्या छतावर अवघ्या १५  फुटाच्या जागेत केसरची यशस्वी शेती करत लाखो रुपये कमवल्याची माहिती समोर आली आहे लॉकडाऊन काळात हिसार जिल्ह्याच्या कोथकला गावात राहणाऱ्या नवीन आणि प्रवीण या दोघी भावांनी आपल्या घराच्या छतावर केसरची शेती सुरू केली.

त्यांनी एक प्रयोग म्हणून ही शेती केली. त्यांनी ऐयरोफोनिक पद्धतीने ही शेती केली. या शेती पद्धतीने त्यांनी ६ते ९ लाखांचं उत्पन्न काढलं आहे.केसरची शेती शक्यतो जम्मू-काश्मीरमध्येच मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, हरियाणाच्या या तरुणांनी ऐयरोफोनिक पद्धतीने ही शेती आपल्या घराच्या छतावर केली. ऐयरोफोनिक पद्धतीने आतापर्यंत इराण, स्पेन, चीन या देशांमध्ये केसरची शेती करण्यात आली आहे. मात्र, भारतात जम्मू-काश्मीरमध्येच केसरची शेती केली जाते. तिथूनच संपूर्ण देश आणि विदेशात केसरचा पुरवठा केला जातो.

नवीन आणि प्रवीण यांनी शेती कशी केली?

नवीन आणि प्रवीण यांनी सर्वात आधी यूट्यूबवर केसरची शेतीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी जम्मूतून केसरचे २५० रुपये प्रतिकिलो हिशोबाने बियाणे खरेदी केले. त्यांनी १००  किलो पेक्षा जास्त बियाणे खरेदी केले. त्यानंतर त्यांनी आपल्या घराच्या छतावर १५× १५ च्या जागेवर प्रायोगिक तत्वावर शेती करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा प्रोजेक्य ऑगस्ट-नोव्हेंबर २०२०  पर्यंत पूर्ण झाला.

 

त्यांनी केलेल्या प्रयोगात एक ते दीड किलो केसरचे उत्पादन झाले. सुरुवातीला त्यांना ६ ते ९ लाखांचे उत्पन्न मिळाले. बाजारात सध्या केसर अडीच ते तीन लाख रुपये प्रतीकिलो दराने विकले जाते.दरम्यान, या शेतीबाबत प्रवीण आणि नवीन यांनी प्रतिक्रिया दिली. “हा प्रोजेक्ट ७ ते १० लाख रुपयात सुरु करता येऊ शकतो. एवढ्या खर्चात वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनही लावता येऊ शकतात. विशेष म्हणजे शेतकरी घरच्याघरी ही शेती करू शकतात. शेतकरी अशा प्रकारच्या शेतीतून १० ते २० लाखांचे उत्पन्न काढू शकतात.

 

केसरच्या शेतीसाठी दिवसा तापमान हे २० अंश सेल्सिअस हवं. तर रात्री १० अंश सेल्सिअस हवे. ९०  टक्के ह्यूमस असली पाहिजे. सूर्यप्रकाशही मिळायला हवा. याशिवाय सूर्यप्रकाश नाही राहिला तर लाईटचा वापर करुन प्रकाश देता येऊ शकतो. मात्र, लॅम्प हा बॅक्टेरिया फ्री असावा. त्याचबरोबर थर्मोकॉलचाही वापर करावा.

English Summary: Saffron cultivation on the roof of the house, earning millions of rupees
Published on: 27 February 2021, 08:20 IST