शेती आणि माती या एकमेकांना परस्पर पूरक गोष्टी आहेत. माती सुपीक तर शेती उत्तम हे गणितच आहे. बऱ्याच अंशी मातीच्या सुरक्षिततेविषयी पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही.
जमिनीची धूप, बाह्य कारकांचा परिणाम, रासायनिक खतांचा अपरिमित वापर इत्यादी कारणांमुळे मातीची सुपीकता नष्ट होत आहे. त्यामुळे बर्याच प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत. याच पार्श्वभूमीवर मातीच्या सुरक्षिततेविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी चौसष्ट वर्षाचे योगगुरू सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी युरोप -मध्यपूर्व ते भारत असा सुमारे 30 हजार किमीचा प्रवास दुचाकीवरून करण्याची मोहीम आखली आहे.
या मोहिमेची सुरुवात 21 मार्च पासून लंडन येथील पार्लमेंट स्क्वेअर पासून करण्यात आली. या प्रसंगी हजारोच्या संख्येने पर्यावरण प्रेमी उपस्थित होते व त्यांनीसद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या दुचाकीला झेंडा दाखवला.
या मोहिमेला जवळजवळ शंभर दिवस लागणार असून या कालावधीत अनेक शहरांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम देखील घेण्यात येणार आहेत. ही मोहीम सुरु करण्या अगोदर उपस्थितांशी बोलताना ते म्हणाले की, मी गेल्या 24 वर्षांपासून पर्यावरणावर बोलत आहे, जागरूकता निर्माण करत आहे परंतु आत्ता त्यावर कृती करण्याची वेळ आली आहे. मातीची सुरक्षिततेविषयी चे समस्या ही संपूर्ण जगाला व्यापणारी असून देशादेशातील धोरणांमध्ये समावेश झाल्याशिवाय उत्तर मिळणार नाही. आता वयाच्या 64 व्या वर्षी दुचाकीवरून प्रवास म्हणजे पाहिजे तेवढी सोपी गोष्ट नाही. परंतु जर गेल्या वर्षाचा विचार केला तर तीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. जमिनीच्या सुपीकता चा प्रश्न हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये निर्माण झाला आहे.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे.कॉनशियस प्लॅनेट या कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबवली जात असून सेव सोईल मूव्हमेन्ट साठी जागतिक अन्न कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाळवंटीकरण विरोधी मोहिमेने पाठबळ दिले आहे.
या माध्यमातून जागतिक पातळीवर नापीक होणारी माती आणि वाळवंटीकरणाचे वाढती समस्या याकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले जावे यासाठीच हा प्रयत्न आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मातीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढावे यासाठी राष्ट्रीय धोरण प्रत्येक देशात तयार करून राबविण्यात यावे अशा आशयाचा लोकमानस या मोहिमेच्या माध्यमातून तयार होईल.
Published on: 02 April 2022, 03:32 IST