सदाभाऊ खोत यांनी आज शनिवार वाडा ते पुणे महानगरपालिका असा सर्व शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा काढला होता. बार्शी येथील एका शेतकऱ्याचा कांद्याचा टेम्पो पुणे महानगरपालिकेने जप्त केला होता. या गोष्टीच्या निषेधार्थ ते आक्रमक झाले होते.
कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तावडी येथील रमेश आरगडे हा शेतकऱ्याने पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर येथे रस्त्याच्या बाजूला टेम्पो लावून कांदा विक्री करत होता. मात्र, पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त महादेव कदम यांनी आरगडे यांचा टेम्पो जप्त करत त्यांना ४० हजारांचा दंड ठोठावला.
शेतकरी रमेश आरगडे यांचा टेम्पो पुणे महापालिकेने जप्त केला होता. त्यामुळे पालिकेने जप्त केलेला टेम्पो महापालिका अधिकाऱ्यांनी सोडतो असे सांगितले होते. असे असताना त्यांना टेम्पो मिळाला नाही.
शेतकऱ्यांनो शेतीच्या अवजारांची अशा प्रकारे राख निगा आणि देखभाल..
रमेश हे टेम्पो आणण्यासाठी गेले असता या पद्धतीचा कोणताही आदेश किंवा निरोप आम्हाला आलेला नाही. त्यामुळे आम्ही टेम्पो सोडू शकत नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या गोष्टीच्या विरोधात सदाभाऊ खोत यांनी महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासनाने दरवाजा न उघडल्याने गेटवर चढून सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसोबत महानगरपालिकेत प्रवेश केला. ही कारवाई करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्याचा टेम्पो जप्त करून तब्बल ४० हजारांचा दंड वसूल केला.
उद्यापासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज..
या निषेधार्थ रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सोमवारी (ता. १७) महापालिकेच्या दारात कांदा विक्री करत आंदोलन केले. पोलिसांसमोरच सदाभाऊ खोत यांनी गेटवरून चढून प्रवेश केला. यावेळी सदाभाऊ खोत चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.
राज्यतील महसूल विभागात तब्बल १३ हजार पदे रिक्त, शेतकऱ्यांना सर्वात जास्त फटका
उद्यापासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज..
भाजपचे बडे नेते दिल्लीत आणि अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, चर्चांना उधाण...
Published on: 17 April 2023, 05:25 IST