News

सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न राज्यात मोठा चर्चेत आहे. या वर्षात राज्यात उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे. विशेषता मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न मोठा ऐरणीवर आला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाखों रुपयाचा फटका बसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील मंठा तालुक्यातही अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे.

Updated on 06 May, 2022 6:17 PM IST

सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न राज्यात मोठा चर्चेत आहे. या वर्षात राज्यात उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे. विशेषता मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न मोठा ऐरणीवर आला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाखों रुपयाचा फटका बसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील मंठा तालुक्यातही अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे.

यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत. आता जवळपास ऊस लागवड करून सतरा महिन्यांचा कालावधी उलटला तरीदेखील उसाची तोड काही होत नसल्याने उसाच्या वजनात मोठी घट होत आहे.

आता एवढा मोठा कालावधी उलटल्यानंतर देखील कारखान्याला ऊस जाईलच याची शास्वती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नाही. यामुळे मंठा तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वावरात उभ्या असलेल्या ऊस पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निदान खरीप हंगामातल्या पिकांची तरी लागवड करता येईल म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

याला म्हणतात सक्सेस! रिटायर्ड ऑफिसरने सुरु केला शेळीपालन व्यवसाय; आज वार्षिक एक कोटींची उलाढाल

Pm Kisan Yojna : पीएम किसानचा 11वा हफ्ता लवकरच होणार बँकेत जमा; पैसे न मिळाल्यास या नंबरवर करा तक्रार

मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. यासाठी हजारो रुपयांचा खर्च केला. ऊसाला पाणी कमी पडू नये म्हणून पाईपलाईन केली. उसाच्या पिकासाठी रात्रंदिवस काबाडकष्ट केले मात्र आता अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या उस कारखान्यात घालवता घालवता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत. परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की सतरा महिन्यांचा कालावधी उलटूनही ऊस कारखान्यात कारखानदार नेतील की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

कालावधी अधिक झाल्यामुळे उसाच्या वजनात घट होत आहे उसाला तुरे फुटतात आहेत. काही ठिकाणी वाढत्या तापमानामुळे तसेच शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडात आग लागण्याच्या घटना देखील समोर येऊ लागल्या आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठा धास्तावला आहे तर काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत वावरात उभ्या असलेल्या उसावर ट्रॅक्टर फिरवला आहे.

सध्या मंठा तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी ट्रॅक्‍टरचलित मल्चर मशीनने उसाचे पीक जमीनदोस्त करत आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, उसामुळे जे नुकसान झाले ते झाले मात्र आता खरीप तरी साधता यावा यासाठी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या उसावर आता ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ येत आहे.

निश्चितच गोड उसाची ही कडू कहानी अतिशय दुःखद असून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना अतिरिक्त उसामुळे मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. शिवाय कारखानदार प्रशासन देखील उदासीन धोरण स्वीकारत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वाटोळ अटळ मानल जात आहे.

English Summary: Sad! The disgrace of driving a tractor on a vertical cane crop; Big loss to farmers
Published on: 06 May 2022, 06:17 IST