आपल्या शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याला नोटांचा खजिनाच सापडला. पटणा येथे एका शेतकऱ्याच्या शेतात हा प्रकार घडला असून नोटांनी भरलेल्या अनेक गोण्या त्याच्या हाती लागल्या आहेत. आणि बघता बघता ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. नोटांनी भरलेली गोणी पाहण्यासाठी लोकांनी तुडुंब गर्दी केली. एवढ्या नोटा पाहून शेतकरीही हडबडला. मात्र या सर्व नोटा जुन्या होत्या. 500 आणि हजारच्या चलनातून बाद झालेल्या या नोटा होत्या.
पटना जिल्ह्यातील पालीगंज उपविभागातील सिंगोडी पोलीस स्टेशन हद्दीत हा सर्व प्रकार घडला आहे. पळसौदा गावात राहणारे अजय सिंग आपल्या शेतात नांगरणी करत होता त्यावेळी जमिनीतून नोटा बाहेर पडल्या. याची माहिती मिळताच शेकडो ग्रामस्थ शेतात पोहचले. आणि हातात मावतील एवढ्या नोटा उचलून पळू लागले. हा प्रकार समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र ग्रामस्थांनी सर्व नोटा घेऊन तेथून धूम ठोकली होती.
नक्की प्रकार काय
अजय सिंग आपल्या शेतात नांगरणी करत होते त्यावेळी त्यांच्या नांगरात काही तरी अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खाली उतरून जेव्हा पहिले तेव्हा त्यांना नांगरात नोटांनी भरलेल्या गोण्या अडकल्याचे दिसले. गोण्या फुटून त्यातून नोटा बाहेर पडल्या होत्या. मात्र या पोत्यात सरकारने बंद केलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या होत्या.
नोटांचा एवढा खच पाहून शेतकरी तर हडबडलाच. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. आणि नोटा उचलण्यासाठी सगळ्यांची एकाच धांदल उडाली. शेवटी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र तोपर्यंत गावकरी सर्व नोटा घेऊन पसार झाले होते.
पत्नीच्या नावाने खोला हे खास खात, दरमहा 45 हजार मिळतील
आता पोलीस एवढ्या मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा जमिनीत कोणी लपवून ठेवल्या होत्या. याचा तपास पोलीस घेत आहेत. आता पोलीस लुटलेल्या जुन्या नोटा मिळवण्यासाठी ग्रामस्थांच्या घरावर छापे टाकत आहेत. आणि हे पैसे कोणाचे आहेत आणि ते कधीपासून जमिनीत गाडले गेले आहेत याचा शोध घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्याच्या मुलाचा जगात गाजावाजा! फेसबुकवर मिळवली करोडोच्या पॅकेजची नोकरी
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात मिळणार इतके पैसे, वाचा डिटेल्स
Published on: 29 June 2022, 10:08 IST