News

गेल्या एक महिन्यापासून रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) मध्ये युद्ध सुरु आहे. या युध्याचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. अन्नधान्य पुरवठा साखळीवर याचा परिणाम झाला आहे. अशियातील पश्चिम आणि दक्षिण देशांमध्ये मक्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

Updated on 02 April, 2022 12:13 PM IST

गेल्या एक महिन्यापासून रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) मध्ये युद्ध सुरु आहे. या युध्याचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. अन्नधान्य पुरवठा साखळीवर याचा परिणाम झाला आहे. अशियातील पश्चिम आणि दक्षिण देशांमध्ये मक्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कारण येथील कुक्कुटपालनात (Poultry farming) कोंबड्यांना आणि जनावरांना देखील चारा म्हणून मक्याचाच वापर करतात.

मक्याचे दर कधी नव्हे ते गगणाला भिडलेले आहे. वाढलेले दर आणि होत नसलेला पुरवठा यामुळे (Maize) मक्याला पर्याय म्हणून तुकडा तांदूळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे तुकडा (Rice Rate) तांदळाचे दर हे 2 हजार 100 रुपयांवर पोहचले आहेत. उत्पादनात घट आणि युध्दजन्य परस्थितीमुळे पुरवठ्यात विस्कळीतपणा झाला आहे.

मकाचे भाव गगनाला

यंदा मक्याचे उत्पादन आणि क्षेत्रही घटले होते. खरीप हंगामातील मका आता अंतिम टप्प्यात आहे. थोड्याबहुत प्रमाणात जी साठवणीक करुन ठेवलेली मका आहे ती हमीबाव केंद्रावर विकली जात आहे. या ठिकाणी 2 हजार 200 रुपये ते 1 हजार 800 पर्य़ंतचे दर मिळत आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे जगातील एकूण मका निर्यातीमध्ये युक्रेनचा वाटा हा 16 टक्के आहे. मात्र, युध्दामुळे येथील निर्यातीवर परिणाम झाला आहे. यामुळेच यंदा मक्याला विक्रमी दर मिळाला आहे. एवढेच नाही तर मका नसल्यामुळे पर्याय म्हणून तुकडा तांदळाला मागणी वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
Gudi Padwa 2022: गुढी पाडव्याला आहे खास महत्त्व; जाणून घ्या या दिवसाचं वैशिष्ट
अतिरिक्त ऊसाबाबत साखर आयुक्तांनी घेतला महत्त्वाचा निर्णय; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

शेतकरी होणार मालामाल

वाढती मागणी आणि घटलेले उत्पादन आणि पुरवठ्यास निर्माण झालेल्या अडचणी यामुळे कधी नव्हे ते तुकडा तांदळाला मक्याएवढी किंमत मिळत आहे. मागणी वाढल्यामुळे तांदळाची उपलब्धताही कमी झाली आहे. मात्र, यंदा उत्पादकता कमी झाल्यामुळे किंमती वाढल्या असून त्याप्रमाणात तुकडा तांदळाची मागणीही वाढत आहे. यामुळे शेतकरी मालामाल होणार आहे.

English Summary: Russia-Ukraine war will make farmers rich
Published on: 02 April 2022, 12:13 IST