रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम हळूहळू भारतातील अनेक क्षेत्रावर पडू लागला आहे. सुरवातीला तेल महागाईचा फटका देशाला बसला तर आता शेतीशी निगडित खत पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सोयाबीन शेतकऱ्यांना अधिक दर मिळू लागला होता. मात्र आता हा अधिक दर खत महागाईच्या रूपाने जाणार की काय अशी चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. या देशांशी संबंधित आयात आणि निर्यातीला सुद्धा मोठा धक्का बसेल असा देखील अंदाज व्यक्त होत आहे.
युद्धाने जागतिक खत बाजार अस्थिर होत असून येत्या काळात शेती क्षेत्रात मोठी खळबळ उडणार असल्याचे दिसत आहे. शिवाय त्याचा खत पुरवठ्यावर परिणाम होऊन दरवाढीचे संकेत दिले जात आहेत. भारत काही खतांची मोठ्या प्रमाणात आयात करतो. याबाबत अर्थमंत्री चिंता व्यक्त करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे खत कंपन्या देखील अस्वस्थ होऊ लागल्या आहेत.
सूर्यफुलासह खतांची आयात रुस आणि युक्रेन येथून करण्यात येते. लाखो टन खत देश आयात करत आहे. रशियातील बेलारूस मधून देखील जवळपास २० टक्के आयात होते. याबाबत नुकतेच आपल्या देशाने रशियासोबत दीर्घकालनी करार केले आहेत. त्यातून दरवर्षी जवळपास २० लाख टन आयात करण्यात येणार आहेत. तर आता या आयातीला मोठा फटका बसणार आहे. शिवाय आणखी काही दिवस युद्ध परिस्थिती जैसे थे राहिल्यास देशात खतांचा तुटवडा देखील जाणवणार आहे.
भारतासह अनेक देश हे खतांसाठी रशियावर अवलंबून आहेत. चीन आणि ब्राझील या देशाला देखील रशियातून खत पुरवठा होतो. खत निर्मितीत रशिया पहिल्या पाच देशांच्या रांगेत आहे. रशियातून सध्या काही अंशी आयात सुरु असल्याचे सांगण्यात येत असले तरी युद्ध परिस्थिती लवकर आटोक्यात न आल्यास मोठ्या प्रमाणात खतांच्या किमती वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
सध्या याबाबत भारत दुसरा पर्याय शोधत असला तरी रशियाएवढा निश्चित पुरवठा होणार असे खत कंपन्यांना वाटत नाही. युरोपीय देशांनी रशियावर बंधने घातली असल्याने खत उपलब्धतेत आणखी अडचणी येऊ शकतात. कच्च्या मालाच्या किमती वाढण्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने नक्कीच खतांच्या किमती वाढणार असे दिसत आहे. तर खत दरवाढ झाल्यास केंद्र सरकारला अनुदान देखील वाढवून द्यावे लागू शकते. यामुळे येणाऱ्या काळात ही एक मोठी डोकेदुखी होऊ शकते.
Published on: 01 March 2022, 05:03 IST