गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेन यांच्यात मोठा वाद सुरु आहे. या युद्धाचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीवर होत आहे. यामुळे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बुधवारी सुरुवातीच्या आशियाई व्यापारादरम्यान सोने किमतीत घट झाली आहे. तर डॉलरच्या किमतीत वाढ झाली आहे आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे मागणी कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारावर नजर टाकल्यास सोने दरात 0.4 टक्क्यांनी घसरत पाहायला मिळत आहे. 1,935.38 डॉलर प्रति औंस आहे.
असे असताना यूएस सोनेचे वायदेही 0.4 टक्क्यांनी घसरून 1,936.50 डॉलरवर आले आहेत. रशिया-युक्रेन (Russia Ukraine Crisis) यांच्यातील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीवर होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने एप्रिल वायदा 2.20 टक्क्यांच्या वाढीसह 51,876 रुपयांवर व्यवहार करत आहे. यामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत.
तसेच, चांदीचा मार्च वायदा 3.79 टक्के अर्थात 2,499 रुपयांनी वाढून तो 68,450 रुपयांवर ट्रेड करत आहे. खरं तर, शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सोनेचा एप्रिल वायदा 50,760 रुपयांवर आणि चांदीचा मार्च वायदा 65,901 रुपयांवर बंद झाला. तसेच मंगळवारी डॉलर निर्देशांक 20 महिन्यांच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला, ज्यामुळे इतर चलन धारकांसाठी सोनेमधील गुंतवणूक कमी झाली आहे. याशिवाय चांदीचा भाव 0.9 टक्क्यांनी घसरून 25.15 डॉलर प्रति औंस झाला.
भारतातील सोन्याचे दर पाहता किलोमागे 6,600 रुपयांनी वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,000 रुपये आणि 24 कॅरेटचा 51,280 रुपये आहे. तसेच खाद्यतेल, शेतातील खते ही देखील महाग झाली आहेत. यामुळे सध्या याची झळ भारतातील सर्वसामान्य लोकांना बसत आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात हे युद्ध वाढणार की कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: 03 March 2022, 11:00 IST