रशिया ने ज्यावेळी युक्रेन देशावर हल्ला केला त्यानंतर अनेक देशांनी रशियावर कडक अर्थिक निर्बंध लावले होते. अमेरिकेने तर रशियाच्या तेल आणि वायूवर सुद्धा बंदी घातलेली आहे. एवढेच नाही अजून असे युरोपीय देश आहेत जे याच मार्गावर आहेत. सध्या रशिया देश आपल्या तेल आणि वायू तसेच इतर गोष्टींसाठी नवीन बाजारपेठ शोधत आहे जे की याचा फायदा भारत देशाला होत आहे. रशिया कडून या सर्वांबाबत मोठी ऑफर भेटली असून आता भारत देश कच्चे तेल तसेच इतर वस्तू खरेदी करण्याच्या तयारीत आहे.
स्वस्त रशियन तेल खरेदी करण्याची तयारी :-
सूत्रांच्या माहितीनुसार अशी एक माहिती समोर आलेली आहे की जी रशिया ने भारताला ऑफर दिलेली आहे यावर भारताचा विचार सुरू आहे. रशियाकडून भारताला कच्चे तेल तसेच इतर काही वस्तू सवलतीमध्ये देण्यासाठी ऑफर दिलेली आहे. जे की या गोष्टींचे पेमेंट एक रुपया-रुबल याप्रमाणेच होणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की सध्याच्या स्थितीत रशिया तेल आणि इतर वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सवलत देत आहे, जे की यामुळे आम्हाला खरेदी करण्यात आनंद होणार आहे. मात्र सध्या आमच्याकडे टँकर, विमा संरक्षण व तेलाच्या मिश्रणाबाबत काही समस्या उदभवलेल्या आहेत जे की या समस्यांचे निराकरण होताच आम्ही रशिया ची ऑफर स्वीकारणार आहे.
बंदी टाळण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांची टाळाटाळ :-
युरोपियन देशांनी जेव्हा रशियावर आर्थिक कडक निर्बंध लावले तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारी सुद्धा रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करण्यास टाळू लागले. मात्र या निर्बंधांमुळे भारताला इंधन खरेदी बाबत कोणाला रोखता येणार नाही. रुपये आणि।रुबल मध्ये व्यवसाय करण्यासाठी यंत्रणांचे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे असे अधिकारी वर्गाने माहिती दिलेली आहे. जे की याचा तेल आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी उपयोग केला जाणार आहे. मात्र रशिया किती सवलत देणार आहे तसेच किती।तेल देणार आहे ही माहिती अजून समोर आलेली नाही.
आयात बिलासह अनुदानाच्या आघाडीवर दिलासा :-
भारत देश हा जवळपास ८० टक्के तेल आयात करतो जसे की रशियाकडून फक्त २ - ३ टक्के तेल खरेदी होते. कच्चा तेलाच्या किमती सुमारे ४० टक्के नी वाढलेल्या आहेत जे की आयात बिल कमी करण्यासाठी भारत देश यावर पर्याय शोधत आहे. क्रूड च्या किमतीमध्ये वाढ झाली असल्यामुळे पुढील अर्थीक वर्षांमध्ये भारताचे आयात बिल हे ५० अब्ज डॉलरने वाढेल. या महत्वाच्या कारणांमुळे केंद्र सरकार स्वस्त तेलासोबतच युरिया तसेच बेलारूस सारख्या खतांचा कच्चा माल स्वस्तात खरेदी करण्याचा विचार करत आहे. ययामुळे सरकारला दिलासा मिळणार आहे.
Published on: 16 March 2022, 05:32 IST