ऑगस्ट महिना (month) सुरू होणार असून 1 ऑगस्टपासून सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण लोकांना नव्या नियमांचा फटका बसू शकतो. त्यामुळे पुढच्या महिन्यात बचत करण्याची गरज पडणार आहे.
गॅसच्या किमती
1 ऑगस्टपासून गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) दरात बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत (Gas cylinder prize) बदल करू शकतात. यावेळी एका सिलिंडरच्या दरात 20 ते 30 रुपयांनी बदल होऊ शकतो. गेल्या वेळी व्यावसायिक गॅस (Commercial gas) सिलिंडर स्वस्त झाला होता, तर घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी वाढला होता.
बँक ऑफ बडोदा चेक पेमेंट सिस्टम
1 ऑगस्टपासून बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये धनादेशाद्वारे पैसे भरण्याचे नियम बदलणार आहेत. तसेच बँक ऑफ बडोदाने ग्राहकांना कळवले आहे की, 1 ऑगस्टपासून, 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशांसाठी 'पॉजिटिव पे' प्रणाली लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत बँकेला धनादेशाशी संबंधित माहिती एसएमएस, नेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे द्यावी लागेल.
हे ही वाचा
RashiFuture: 'या' राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता; जाणून घ्या राशिविषयी...
पॉजिटिव पे प्रणाली लागू
बँकिंग फसवणूक रोखण्यासाठी RBI ने 2020 मध्ये धनादेशांसाठी 'पॉझिटिव्ह पे सिस्टम' (Positive pay system) सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रणालीद्वारे चेकद्वारे 5,00,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरण्यासाठी काही महत्त्वाच्या तपशीलांची आवश्यकता असू शकते. या प्रणालीद्वारे चेकचे तपशील मेसेजिंग, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे दिले जाऊ शकतात. धनादेश भरण्यापूर्वी हे तपशील तपासले जातात.
बँका 10 दिवस बंद राहतील
यावेळी ऑगस्टमध्ये मोहरम (Muharram), स्वातंत्र्यदिन (Independence Day), पारसी नववर्ष, गणेश चतुर्थी असे अनेक सण येत आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात 10 दिवस बँका बंद राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
Crop Insurance Scheme: पीक विमा योजनेसाठी महसूल विभागाचा पुढाकार; घेतला 'हा' मोठा निर्णय
Farmers Loan: सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी 1 कोटींचा निधी उपलब्ध
Mosambi Disease: पिकावर झपाट्याने होतोय रोगांचा प्रादुर्भाव; आताच करा उपाययोजना, अन्यथा होईल नुकसान
Published on: 29 July 2022, 03:47 IST