पुणे : शेअर बाजाराच्या इतिसाहसाकडे पाहिल्यास कदाचित अशा ठराविक घटना दिसतील ज्या आपल्याला आवक करणाऱ्या ठरतात. शेतीच्या क्षेत्राशी निगडित असणाऱ्या रुची सोया या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत गेल्या सहा महिन्यात नऊ हजार टक्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारीत या शेअरची किंमत केवळ १७ रुपये होती. २९ जूनला या शेअरची किंमत १५३५ इतकी झाली.
खाद्यतेल क्षेत्रातील या कंपनीला मागच्या वर्षी रामदेवबाबा यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीने विकत घेतले. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये खूप जास्त वाढ झाली. रुची सोया ही खाद्यतेल निर्मितीतील मोठी कंपनी आहे. जेव्हा या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली तेव्हा रामदेवबाबा यांच्या पतंजलीने ही कंपनी विकत घेतली. परंतु मागच्या काही दिवसात हा शेअर थोड्या प्रमाणात पडला असून तो सध्या ७४० च्या आसपास आहे. परंतु देशातील खाद्यतेलाची मागणी लक्षात घेता आणि पतंजली हा ब्रँड लक्षात घेता हा शेअर भविष्यात पुन्हा वाढू शकतो.
Published on: 23 July 2020, 09:19 IST