News

सध्या धान्य बाजार तेजीत आहे. यामुळे बाजारभावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता इंदापूर येथे भुसार शेतमाल विक्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (Indapur APMC) मालदांडी ज्वारीला (Maldandi Jowar) ५००१ रुपये दर मिळाला आहे.

Updated on 09 November, 2022 6:20 PM IST

सध्या धान्य बाजार तेजीत आहे. यामुळे बाजारभावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता इंदापूर येथे भुसार शेतमाल विक्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (Indapur APMC) मालदांडी ज्वारीला (Maldandi Jowar) ५००१ रुपये दर मिळाला आहे.

तसेच बाजरीला ३३६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. इंदापूर व भिगवण उपबाजारात या सप्ताहात एकूण १७ हजार पिशव्यांची भुसार शेतीमालाची आवक झाली. या परिसरात देखील कडधान्य मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते.

यामध्ये ज्वारीच्या ३४ पोती, बाजरीच्या ३६३ पोत्यांची आवक झाली. तर मका १४,२५० पोत्यांची आवक झाली. यामध्ये मक्याला (Maize Rate) २२०० रुपये, गव्हाला (Wheat Rate) ३२०० रुपये क्विंटल दर इंदापूर व भिगवण बाजारात मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सोयाबीन, ऊस, हरभरा या पिकातील सुरवातीपासून तणांची चिंता संपली

दरम्यान, खरेदीसाठी आंध्रप्रदेश, कलकत्ता, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांतून मागणी आहे. कांदा विक्री प्रतिक्विंटल ६०० ते ३२०० या दराने झाली आहे, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा!लम्पीमुमृत्युमुखी पडलेल्या 3973 पशूंची नुकसान भरपाई खात्यावर जमा

तसेच समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये डाळिंब विक्री किमान ४० ते २५१ रुपये प्रतिकिलो या दरात होत आहे. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.

महत्वाच्या बातम्या;
भारतीय अन्न आणि कृषी, जगाचे पॉवरहाऊस
उसाचे वजन आता मोफत करून मिळणार, काटामारीमुळे नेता उतरला मैदानात..

English Summary: rs 5001 for Maldandi jowar
Published on: 09 November 2022, 06:18 IST