News

कोणतेही यश सहजासहजी मिळत नसते. यशाचा शिखर पार करायचा असेल तर मेहनतही तेवढी घ्यावी लागते. अशाच आपल्या स्वकष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर ज्यांनी यशाला गवसणी घातली असे कॉर्पोरेट अफेअर्स एफ. एम. सी इंडियाचे संचालक राजू कपूर यांनी कृषी जागरण चौपाल अधिवेशनाला आज भेट दिली.

Updated on 11 July, 2022 6:59 PM IST

कोणतेही यश सहजासहजी मिळत नसते. यशाचा शिखर पार करायचा असेल तर मेहनतही तेवढी घ्यावी लागते. अशाच आपल्या स्वकष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर ज्यांनी यशाला गवसणी घातली असे कॉर्पोरेट अफेअर्स एफ. एम. सी इंडियाचे संचालक राजू कपूर यांनी कृषी जागरण चौपाल अधिवेशनाला आज भेट दिली. कृषी जागरणतर्फे पुष्पगुछ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी जागरणचे मुख्य संपादक एम सी डॉमिनिक, संचालक शायनी डॉमिनिक तसेच इतर टीम सदस्य आणि सोबतच कृषी जागरणचा कृषी पत्रकार वर्गदेखील यावेळी उपस्थित होता.

राजू कपूर,हे USA येथे स्थित FMC कॉर्पोरेशन या जागतिक कृषी कंपनीच्या भारतीय उपकंपनीसह उद्योग आणि सार्वजनिक व्यवहारांसाठी कॉर्पोरेट अफेअरचे संचालक आहेत. राजू कपूर यांना कृषी आणि रासायनिक उद्योगांचा जवळपास ४० वर्षांचा अनुभव आहे. आपल्या भाषणातून त्यांनी आतापर्यंत आलेले अनुभव व्यक्त केले. विशेष करून त्यांनी ग्रामीण महिलांना येणाऱ्या समस्यांबद्दल भाष्य केले.

महिलांचा आर्थिक स्तर सुधारण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. महिलांचे शेती क्षेत्राशी असलेलं नातं हे जुनं आणि तितकंच घट्ट आहे. त्यामुळे मीडियाने आता या महिलांचे जीवनमान कसे सुधारता येईल याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. मासिक पाळी बाबतही बऱ्याच ग्रामीण महिला जागृत नसतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर या माध्यमातून जागृता निर्माण करता येईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कृषी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी शेती क्षेत्रात मीडियाचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. सोबतच इंडस्ट्री आणि मीडिया एकत्र आल्यास कृषी क्षेत्राला अधिक फायदा होईल असा विश्वास त्यांनी दाखवला. राजू कपूर यांच्याकडे पीक उत्पादन, कीटकनाशके, पीजीआर, बीजन, पशुसंवर्धन आणि आरोग्यसेवा या क्षेत्रात त्यांना बराच अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी विविध नामांकित कॉर्पोरेशनमध्ये व्यवसाय आणि नफा केंद्रांचे नेतृत्वही केले आहे.

त्यांनी विविध प्रकारचे व्यवसाय निर्माण केले आणि विकसित केले. राजू कपूर यांचे शेतीच्या शाश्वततेसाठी महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पीक उत्पादन, कीटकनाशके, पीजीआर, बियाणे, पशुखाद्य आणि आरोग्य उत्पादनांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. जीबी पंथा विद्यापीठातून कृषी आणि पशुसंवर्धन या विषयात बॅचलर पदवी घेतलेल्या राजू कपूर यांनी मार्केटिंगमध्ये एमबीए केले आहे.

नावीन्यपूर्ण व्यवस्थापनासाठी ओळखले जाणारे राजू कपूर हे यापूर्वी FMC इंडियामध्ये डाऊ अॅग्रो सायन्समध्ये कार्यरत होते. शेवटी त्यांनी कृषी जागरणाच्या पत्रकारांच्या प्रश्नांचे निरसनही केले.

महत्वाच्या बातम्या
बातमी शेतकऱ्यांच्या फायद्याची! खतनिर्मिती क्षेत्रातील 'या' दोन कंपन्यांकडून खताच्या दरांमध्ये कपात, वाचा माहिती
'इतक्या वर्ष पायी वारी केली, आणि त्यांचे जीवनच धन्य झाले...'

English Summary: 'Role of women is important in agriculture'
Published on: 11 July 2022, 06:52 IST