शेताला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी शेतात पोचण्यासाठी रस्त्यांची आवश्यकता असते. तसेच पिकलेला शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी देखील शेतातूनचांगला रस्ता असणे गरजेचे आहे.
या व्यापक दृष्टिकोनातून मातोश्री पानंद रस्ते योजना सुरू करण्यात आली असून मंजूर पाणंद रस्त्याच्या कामाला गती देऊन ही रस्ते 15 जूनपर्यंत पूर्ण करा, असे आदेश रोजगार हमी योजना तसेच फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. अमरावती येथील नियोजन भवनात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विविध कामे त्यासोबतच मातोश्री पानंद रस्ता योजनेच्या अंमलबजावणीबाबत अमरावती विभागाची आढावा बैठक रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला रोजगार हमी योजना विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार, अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह, नरेगा आयुक्त शांतनु गोयल, अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवणीत कौर, अकोल्याची जिल्हाधिकारी निमा अरोरा इत्यादी मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.
शेती व शेतीपूरक उद्योगांचा विकास व्हावा यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पानंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगतरोजगार हमी योजना मंत्री श्री संदीपान भुमरे म्हणाले की, दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरणा शिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतमाल बाजारात पोचवण्यासाठी व लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंतपोहोचण्यासाठी शेतीला बारमाही चांगले रस्त्यांची गरज असून पानंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामासाठी आवश्यक साधनांची ने आन करण्यासाठी उपयोगात येतात.
यासाठी मातोश्री पानंद रस्ता योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळावा आणि पावसाळ्यापूर्वी म्हणजे 15 जून पर्यंत पाणंद रस्त्याचे काम पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:Onion : कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे आव्हान; नाफेडला कांदा विकु नका; कारण…….!
Wheat Variety : शास्त्रज्ञांनी विकसित केली गव्हाची नवीन जात; गहू उत्पादकांना होणार मोठा फायदा
Published on: 28 April 2022, 07:29 IST