विदर्भ, मराठावाडा, खानदेशात सुर्य कोपला आहे. विदर्भात तापमान अधिक असल्याने सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यत: उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या अनेक भागात पावासाने हजेरी लावली. यामुळे दुपारपर्यंत ऊन आणि त्यानंतर पावसाचा अनुभव नागरिकांना येत आहे.
दरम्यान देशातील इतर राज्यात मात्र पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासात साधारण १० राज्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थानच्या काही भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, पुर्वोत्तर भारत, तामिळनाडूनमधील काही भाग, केरळ, कर्नाटक, उत्तराखंड, आणि हिमाचल प्रदेशात हलक्या प्रतीचा पाऊस पडणार आहे. मागील २४ तासात जम्मू कश्मीर, हिमाचल लद्दाख, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशातील काही भागात पावसाने हजेरी लावली. तर महाराष्ट्रातील विदर्भात तापमानाचा पारा वाढलेला दिसला.
सोमावारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील तापमान
पुणे ३९.३, जळगाव ४३.३, धुळे ४२.४, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३३.५, मालेगाव ४२.०, नाशिक ३७.९, निफाड ३९.०, सांगली ४०.०, सोलापूर ४२.९, डाहाणू ३३.८, सांताक्रुझ ३४.०, रत्नागिरी ३५.२, औरंगाबाद ४०.९, परभणी ४३.७, नांदेड ४३.५, अकोला ४४.९, अमरावती ४३०८, बुलडाणा ४१.४, बह्मपुरी ४४.९, चंद्रपूर ४३.८, गोंदिया ४२.९, नागपूर ४४.२, वर्धा ४४.२.
Published on: 05 May 2020, 12:57 IST