मागील काही दिवसांपूर्वी जो झालेला मुसळधार पाऊस आहे त्याचा परिणाम फक्त मराठवाडा मधील खरीप पिकांवर झालेला नाही तर बाहेरच्या राज्यातील भात शेतीवर सुद्धा झालेला आहे. पावसामुळे भाताच्या शेतीवर मोठा परिणाम झाला असल्याने याचा प्रभाव तांदळाच्या दरावर पडला. जवळपास २० टक्के उत्पादन घटेल असा अंदाज लावला आहे तर काही दिवसात बासमती तांदळाचे दर प्रति क्विंटल २००० रुपये ने वाढतील असे अंदाज व्यक्त केले आहेत.
बासमती तांदूळ १५० देशांसाठी निर्यात केला जातो:
सध्या बासमती तांदळाचे दर प्रति क्विंटल ८५०० रुपये आहेत तर दुसऱ्या बाजूला किरकोळ बाजारात या तांदळाला ग्राहक प्रति किलो साठी ७०-९० रुपये देत आहेत. भारतामधून बासमती तांदूळ १५० देशांसाठी निर्यात केला जातो. भारतात पंजाब, उत्तरप्रदेश व हरियाणा मध्ये बासमती तांदळाची लागवड केली जाते. पश्चिम उत्तर प्रदेश मधील मेरठ, सहारनपूर, आग्रा, अलिगड, मुरादाबाद, बरेली या जिल्ह्यात बासमती तांदूळ तयार होतो जे की या ठिकाणी या तांदळासाठी लागणारे हवामान आणि माती योग्य आहे.
बासमती तांदळासाठी सात राज्यामधील जवळपास ९५ जिल्हे असे आहेत ज्यांची भौगोलीक परिस्थिती तसेच तांदळासाठी पोषक वातावरण आहे त्यामुळे एकट्या भारत देशातून १५० देशात तांदूळ पाठवला जातो. देशातील जी सात राज्ये आहेत त्यामध्ये पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि जन्मू कश्मीर यांचा समावेश आहे.
यामुळे वाढणार बासमती तांदळाच्या किमती:-
मागील काही दिवसांपूर्वी जो झालेला मुसळधार पाऊस होता त्या पाऊसाने बासमती भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ४ लाख ५० हजार हेक्टर जमिनीवर १६ लाख टन बासमतीचे उत्पादन होते.यामध्ये १० लाख टन बासमती तांदूळ तयार होतो जे की पाऊसमुळे आणि गंगेला पूर आल्याने २० ते २५ टक्के नुकसान झाले आहे. येईल या काही दिवसातच बासमती तांदळाचे दर प्रति क्विंटल ११ हजार वर पोहचतील असा व्यापारी वर्गाचा अंदाज आहे.
Published on: 18 November 2021, 08:56 IST