स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी रत्नागिरी जिल्हाबंदीच्या आदेशानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे आता वातावरण चांगलेच तापले आहे. आता बारसूत अन्यायग्रस्तांच्या लढ्याला पाठिंबा द्यायला जाणारच असल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले, मनाई आदेश मागे न घेतल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय लढ्यासाठी कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील बारसूमध्ये जाणार आहे.
आपण मनाई आदेश करू नये, अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. राजू शेट्टी यांच्यामार्फत रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना हा इशारा दिला आहे. राजू शेट्टी यांना रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बारसूत भेट देण्यास मनाई आदेश काढला आहे.
पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार, ही 2 महत्त्वाची कामे लवकर उरका
या नोटीशीला राजू शेट्टी यांनी उत्तर पाठवले आहे. भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार राजू शेट्टींना बारसू येथे जाण्यास तसेच प्रतिक्रिया देणेचा अधिकार आहे. त्यांच्या विरोधात काढण्यात आलेला आदेश बेकायदेशीर आहे.
सदर मनाई आदेश तातडीने मागे घ्यावा, अन्यथा आम्हाला तुमच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असेही ते म्हणाले आहेत. यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचं ठरलं! शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष होणार? कर्नाटक दौरा अचानक रद्द..
दरम्यान, 6 मे ला उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मी येत्या 6 तारखेला बारसूला जाणार आणि त्या ठिकाणी बोलणार, तुम्ही मला कोण अडवणारे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निर्धार केला आहे. बारसूमधील लोकांना मी भेटणार आणि त्यांच्याशी बोलणार असे सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आव्हान स्वीकारले आहे.
शेतकऱ्यांनो पीक विम्यासाठी असा करा क्लेम, शेतकऱ्यांना मिळेल मदत, जाणून घ्या...
मनरेगा सिंचन योजनेतील शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार ४ लाखांचे अनुदान
पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार, ही 2 महत्त्वाची कामे लवकर उरका
Published on: 04 May 2023, 09:45 IST