News

तसेच जिल्ह्यातील महसूल आणि पशुसंवर्धन विभागाशी निगडित इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मंत्री श्री. विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सर्व समस्यांचा आढावा घेत त्या तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.

Updated on 28 June, 2024 1:28 PM IST

मुंबई : महसूल मंत्री तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विषयांवरील आढावा बैठक विधान भवनात झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत सिल्लोड तालुका दूध संघाने महानंदसोबत सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सिल्लोड तालुक्यातील सोयगाव पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील महसूल आणि पशुसंवर्धन विभागाशी निगडित इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मंत्री श्री. विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सर्व समस्यांचा आढावा घेत त्या तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.

या बैठकीसाठी पणन व अल्पसंख्याक विकास विभाग मंत्री अब्दुल सत्तार, महसूल विभागाचे अपर सचिव राजेशकुमार, महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर तर दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि पोलीस अधीक्षक मनीष कलवाणीया उपस्थित होते.

English Summary: Review of various issues of Chhatrapati Sambhajinagar district by Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil
Published on: 28 June 2024, 01:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)