News

शेतकऱ्यांना सध्या अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. असे असताना आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. परतीच्या पावसाने झालेले सोयाबीनचे (Soybean) नुकसान आणि खासगी फायनान्सचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी (Parbhani) जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.

Updated on 16 October, 2022 12:38 PM IST

शेतकऱ्यांना सध्या अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. असे असताना आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. परतीच्या पावसाने झालेले सोयाबीनचे (Soybean) नुकसान आणि खासगी फायनान्सचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी (Parbhani) जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.

गुलाब जीवने यांनी आत्महत्या केली आहे. तरुण शेतकरी गुलाब जीवने यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. या शेतात त्यांनी सोयाबीन लावले होते. मात्र, परतीच्या पावसाने हे सोयाबीन वाया गेले. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच खासगी फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज डोक्यावर आणि नुकसान पाहता हे कर्ज फेडायचे कसे व आपला प्रपंच चालवायचा कसा या विवंचनेत गुलाब जीवने यांनी विषारी औषध प्राशन केले.

यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांना आधी प्रथमोपचार करुन त्यांना परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी गुलाब जीवने यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात लहान भाऊ आणि आई आहे. यामुळे घरच्यांना मोठा धक्का बसला. सध्या राज्यात परतीच्या पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे.

बातमी कामाची! लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना ३० हजारांपर्यंतची मदत

राज्यातील विविध जिल्ह्यात या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हाती आलेली पिकं या परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ह्रदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे.

देशातील 600 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कृषी समृद्धी केंद्र सुरू होणार, मोदींच्या हस्ते लोकार्पण..

सत्तेची धुंदी आणि एकमेकांचा पक्ष संपवण्याच्या नादात व्यस्त असलेल्या राजकारणी आणि सरकारला अन्नदात्या शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही. त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालायलाच हवे असा इशारा तुपकरांनी दिली आहे. अनेक शेतकरी राज्यात आत्महत्या करत आहेत. यामुळे याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या;
एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्या, ऊस दरासाठी राजू शेट्टींचा एल्गार
बनावट खताची पोती बाजारात, शेतकऱ्यांचे होतय मोठं नुकसान..
एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्या, ऊस दरासाठी राजू शेट्टींचा एल्गार

English Summary: Returning rains damage soybeans, 24-year-old farmer dies
Published on: 16 October 2022, 12:38 IST