News

मुंबई: फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 28 मे रोजी जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळाअंतर्गत बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

Updated on 28 May, 2019 12:21 PM IST


मुंबई:
फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 28 मे रोजी जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळाअंतर्गत बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

संबंधित संकेतस्थळे: 

  • http://www.mahresult.nic.in
  • http://www.hscresult.mkcl.org/
  • http://results.maharashtraeducation.com/

वरील संकेतस्थळांवर सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण सदर संकेतस्थळावर दिसतील तसेच याची प्रिंटआऊटही घेता येईल. याशिवाय बारावीचा निकाल एसएमएस सेवेद्वारेही मोबाईल फोनवरुन मोबाईल ऑपरेटरद्वारे उपलब्ध होतील. MHHSC <space> <seat no> असा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठविल्यास विद्यार्थ्यांना निकाल कळू शकेल.

http://www.mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती मिळेल. ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थ्यांना लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून, यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बारावीची पुरवणी परीक्षा मागील वर्षाप्रमाणेच जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात येणार असल्याचे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

English Summary: Results of HSC Today
Published on: 28 May 2019, 07:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)