News

अमरावती : मेळघाटातील डोंगर माथ्यावर अनेक शेतकरी शेती करतात. परंतु पारंपरिक पिकांमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळला. स्ट्रॉबेरी या पिकाने येथील शेतकऱ्यांना एक आर्थिक उत्पन्नाचा मार्ग दाखवला.

Updated on 21 June, 2021 6:39 AM IST

अमरावती : मेळघाटातील डोंगर माथ्यावर अनेक शेतकरी शेती करतात. परंतु पारंपरिक पिकांमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळला. स्ट्रॉबेरी या पिकाने येथील शेतकऱ्यांना एक आर्थिक उत्पन्नाचा मार्ग दाखवला.

या पिकाला अपेक्षित असलेले हवामान व पर्यटकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे 10 गुंठे शेतीत सुमारे 2 लाखाचे उत्पन्न या पिकातून होते. याच पिकांवर संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून येथे संशोधन केंद्र उभारण्यात यावे अशी विनंती केली आहे.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित श्री शिवाजी कृषी विद्या महाविद्यालयाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या अनुदानातून येथे अनेक प्रयोग केले. चिखलदरा येथे दोन वर्ष शेतकऱ्यांवर संशोधन केलेल्या संशोधनाला यश मिळाल्यामुळे 10 गुंठे शेतीमध्ये सुमारे 2 लाखाचे उत्पन्न घेणे शक्‍य झाले.

 

हे संशोधन यशस्वी झाल्याचे पाहतात येथे कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन केंद्र उभारण्यात आल्यास त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यासंदर्भात माहिती देताना शिवाजी विज्ञान विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शशांक देशमुख यांनी सांगितलं की, स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र निर्माण झाल्यास मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांना अतिशय कमी दरात रोपे उपलब्ध होतील तसेच स्ट्रॉबेरीच्या स्थानिक जाती विकसित करता येतील. यामुळे शीतगृह साठवण गृह तयार झाल्यास स्ट्रॉबेरीचे फळ जास्त दिवस टिकवून ठेवता येईल, असेही शशांक देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, एकीकडे शेतीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येत आहे तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. राज्यात मान्सून दाखल झाला. चांगला पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला जोरदार सुरुवात केली. पण बोगस बियाणे माथी मारल्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर निराश होण्याची वेळ आली आहे.

English Summary: Research will be on strawberries yielding Rs 2 lakh on 10 guntas of land
Published on: 21 June 2021, 06:39 IST