कृषी क्षेत्रातले संशोधन आणि कल्पकता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी

Sunday, 26 August 2018 08:04 AM
आंध्र प्रदेशमधल्या कृष्णा जिल्ह्यातल्या एस. एन. पालेम गावातल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधताना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू

आंध्र प्रदेशमधल्या कृष्णा जिल्ह्यातल्या एस. एन. पालेम गावातल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधताना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू

कृषी क्षेत्रातले संशोधन आणि कल्पकता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. शेती अधिक किफायती आणि व्यवहार्य ठरावी यासाठी शेतकऱ्यांसमवेत समन्वय राखावा असे आवाहन त्यांनी वैज्ञानिक आणि संशोधकांना केले.

शेतकऱ्यांना सबल करून कृषी क्षेत्र दृढ करणे म्हणजेच ग्रामीण भारत विकासाला मदत होय असे ते म्हणाले. झिरो बजेट नैसर्गिक शेतीची संकल्पना यशस्वीरित्या राबवणाऱ्या आंध्र प्रदेशमधल्या कृष्णा जिल्ह्यातल्या एस. एन. पालेम गावातल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

आंध्र प्रदेशमध्ये वापरेलेले कृषी तंत्रज्ञान हे शाश्वत शेतीसाठी मॉडेल ठरू शकते कारण यामध्ये मोठ्या गुंतवणुकीची गरज नसते आणि उत्पादकतेला मात्र चालना मिळते असे उपराष्ट्रपती म्हणाले.

Zero Budeget Research venkaiah naidu farmers उपराष्ट्रपती झिरो बजेट नैसर्गिक शेती शेतकरी संशोधन एम. व्यंकय्या नायडू

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.