News

मुंबई – सद्यस्थितीत कोरडवाहू शेती क्षेत्रात बदलत्या हवामानानुसार संशोधन करावे, त्यानुसार शिक्षणप्रणाली राबविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने हवामान बदलानुसार पीक पद्धती, मशागत तंत्रज्ञान, नवीन वाणांची सुधारणा याविषयी संशोधन व विस्तार शिक्षण हाती घेण्यात यावे, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेची 105 वी बैठक मंत्री कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली.त्यावेळी ते बोलत होते.

Updated on 28 September, 2021 10:41 PM IST

सद्यस्थितीत कोरडवाहू शेती क्षेत्रात बदलत्या हवामानानुसार संशोधन करावे, त्यानुसार शिक्षणप्रणाली राबविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने हवामान बदलानुसार पीक पद्धती, मशागत तंत्रज्ञान, नवीन वाणांची सुधारणा याविषयी संशोधन व विस्तार शिक्षण हाती घेण्यात यावे, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेची 105 वी बैठक मंत्री कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली.त्यावेळी ते बोलत होते.

कृषी विद्यापीठातील उपलब्ध सर्व साधनसामुग्रीचा आढावा घेऊन त्यानुसार त्याचा वापर प्रभावीपणे करण्यावर भर द्यावा. कृषी विद्यापीठांनी विद्यार्थीनींसाठी वसतीगृह बांधकामासाठी सीएसआर सारखे इतर निधी उपलब्ध करून कार्यवाही करावी, असे निर्देशही भुसे यांनी दिले. कृषि अभ्यासक्रमात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करणे तसेच जटील समस्यांचे संशोधनासाठी विषय सूचविणे याबाबत कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुंनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही भुसे यांनी यावेळी केले.

हेही वाचा : शेतमाल साखळीसाठी ‘ऑपरेशन ग्रीन’ ; 1 कोटीपर्यंत अनुदान घेण्यासाठी राहिले फक्त पाच दिवस

कृषी विद्यापीठ व केंद्र शासनाच्या विविध पिकांच्या संशोधन केंद्रांचे संशोधन कार्य प्रभावीपणे शेतकऱ्यांच्या उपयोगी पडेल या दृष्टीने विस्तार कार्य हाती घेणे गरजेचे आहे. या संदर्भात सोलापूर व नाशिक जिल्ह्यातील डाळींब पिकांच्या संदर्भात निर्माण झालेल्या गंभीर समस्यासंदर्भात राहुरी कृषि विद्यापीठाने भरीव कार्य करण्याची आवश्यकताही कृषीमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

English Summary: Research and education system should be implemented in the field of dryland agriculture according to the changing climate
Published on: 28 September 2021, 10:37 IST