मित्रांनो अनेक नॅशनल (National) तसेच इंटरनॅशनल कंपन्या (International Company), तसेच सरकारी व निमसरकारी संस्था आपल्या कामगारांना दिवाळी तसेच इतर महत्वाच्या सणाला बोनस (Bonus) देत असतात. पण सर्व जगाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्याला (Farmer) मात्र कुणी काही सणासुदीला बोनस देत नाही. त्याला मात्र त्याच्या कष्टाच्या जोरावरच कमाई करावी लागते आणि आपले व आपल्या परिवाराचे पोट भागवावे लागते
कंपन्या आपल्या कामगारांना खुष करण्यासाठी व दिवाळीचे गिफ्ट म्हणुन आपल्या कामगारांना बोनस देऊ करतात, पण शेतकरी राजाला खुष करण्याचा त्याला आंनद देण्याचा कुणीच विचार करत नाही. पण आता शेतकऱ्यांना देखील दिवाळीचा बोनस मिळणार अशी अपेक्षा आहे. सरकार ह्या दिवाळीला शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचे पाऊल उचलणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना थोडा आनंद मिळेल एवढे नक्की. मित्रांनो शेतकरी बांधवाच्या कल्यानासाठी सरकार काही योजना राबवित असते. अशीच एक योजना आहे पीएम किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojna). शेतकरी मित्रांनो ह्याच पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता आता वाढणार आहे असे वृत्त प्रसार माध्यमातून समोर येत आहे. जर हि बातमी खरी झाली तर हे शेतकऱ्यांसाठी खरंच एक दिवाळी बोनस (Diwali Bonus) असेल.
पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता होणार दुप्पट
मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आपली तिजोरी खुली करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो इच्छितो की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojna) 6000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. पण आता हि रक्कम दुप्पट करण्याचा सरकार विचार करत आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, सरकार (Government) पीएम किसान सन्मान निधीची रक्कम दुप्पट म्हणजेच 12000 रुपये करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
असे झाल्यास शेतकऱ्यांना जो हफ्ता पूर्वी 2000 चा मिळत होता तो वाढून आता 4000 रुपये होईल. म्हणजे जे 2000 चे आधी तीन हफ्ते मिळत होते ते आता 4000 चे तीन मिळतील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा (Pm Kisan Sanman Nidhi Yojna) दहावा हफ्ता हा डिसेंबर मध्ये येणार असे सांगितलं जात आहे. डिसेंबर च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दहावा हफ्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील.
Published on: 28 October 2021, 09:33 IST