नवी दिल्लीः रेनो इंडिया (Renault India) ने नुकतीच आपली Renault Kwid हॅचबॅक २०२१ मॉडल भारतात लाँच केले आहे. कंपनीने यात अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. सर्वात मोठे अपडेट म्हणजे यात सर्व व्हेरियंट्स मध्ये अतिरिक्त ड्युअल एअरबॅग्स म्हणून स्टँडर्ड दिले आहेत. याशिवाय, यात ड्रायव्हर साइड पायरोटेक आणि प्रीटेशनर दिले आहेत. आज या कारची किंमत आणि फीचर्स संबंधीची माहिती आपण घेऊ.
2021 Renault Kwid specifications), फीचर्स (2021 Renault Kwid features) आणि किंमत (2021 Renault Kwid price) संबंधी माहिती देत आहोत. तुम्ही स्वतः पाहा. तुमच्या बजेटमध्ये रेनो क्विड हॅचबॅक किती बेस्ट आहे. 2021 रेनो क्विड हॅचबॅक एक ५ सीटर कार आहे. ज्यात पुढे दोन आणि मागे ३ लोक बसू शकतात. यात २८ लीटरची क्षमतेचे फ्यूल टँक दिले आहे. 2021 रेनो क्विड भारतीय बाजारात दोन इंजिनसोबत लाँच करण्यात आली आहे. यात ०.८ लीटर आणि १.० लीटर इंजिनचा समावेश आहे. २०२० क्विड मॉडलमध्ये हे इंजिन मिळते.
2021 Renault Kwid: ट्रांसमिशन
Renault Kwid 0.8-लीटर: यात ५-स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन मिळतो.
Renault Kwid 1-लीटर: यात ५-स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन सोबत ऑटोमॅटिक ट्रांसमिशनचा पर्याय मिळतो. Renault Kwid च्या फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक दिले आहे. तर याच्या रियर मध्ये ड्रम ब्रेक दिले आहे.
यात लोअर ट्रांसवर्स लिंक सोबत MacPherson strut दिले आहे. यात क्वाइल स्प्रिंग सोबत ट्विस्ट बीम सस्पेंशन दिले आहे. 2021 रेनो क्विड च्या ०.८ लीटर स्टँडर्ड वेरिएंटची शुरुआती दिल्ली एक्स-शोरूम किंमत ४.०८ लाख रुपये आहे. याच्या टॉप एंड वेरिएंटवर ५.५१ लाख रुपयांपर्यंत जाते.
Published on: 12 September 2021, 05:08 IST